
अनुक्रमणिका
|
श्री भीमाशंकर मंदिराच्या अधिक माहितीसाठी ह्या image वर क्लिक करा…
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगांमधूनच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली…

लोहगड किल्ल्याच्या अधिक माहितीसाठी ह्या image वर क्लिक करा…
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोहगड या किल्ल्याची माहिती पाहणार आहोत. कोणत्याही किल्ल्यासाठी भौगोलिक स्थान फार महत्त्वाचे असते. लोणावळ्या नजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक रांग आहे. त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड. लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदरदृश्य दिसते…

श्री मांढरदेवी काळुबाई मंदिराच्या अधिक माहितीसाठी ह्या image वर क्लिक करा…
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काळुबाई या देवीचे मंदिर आहे. वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते. तिला शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात. श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचे रूप आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस पूर्ण करणारे भाविक वर्षभर येत असतात…

डिंभे धरणाची अधिक माहितीसाठी ह्या image वर क्लिक करा…
डिंभे धरण हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोड नदीवर बांधण्यात आलेले आहे. याचे बांधकाम इसवी सन १९७८ मध्ये सुरू करण्यात आले होते. या धरण क्षेत्रांमध्ये आंबेगाव, वचपे, कोलतावडे, पांचाळे, कळंबई, दिगद, मेघोली, कुशीरे, म्हाळुंगे, दिंभे, फुलवडे ह्या गावांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे.

गणपतीपुळे मंदिराची अधिक माहितीसाठी ह्या image वर क्लिक करा…
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ तसेच पर्यटन स्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात असलेलं हे एक अतिशय सुंदर मंदिर आहे…
