अक्कलकोट (श्री स्वामी समर्थ)

 

अक्कलकोट, सोलापूर

श्री स्वामी समर्थांचा अवतार व इतिहास.

History of Shree swamisamarth Akkalkot.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे प्रसिद्ध देवस्थान आहे. स्वामी समर्थ यांचे मंदिर येथे असून, अक्कलकोट शहर कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्याचे हे शहर तालुक्याचे ठिकाण आहे.

 

|| श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र ||

निःशंक हो निर्भय हो मना रे।

प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।

अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।

अशक्यही शक्य करतील स्वामी ।१

जिथे स्वामिपाय तिथे न्यून काय ।

स्वये भक्त - प्रारब्ध घडवी हि माय ।

आज्ञेविणा ना काळ ना नेई त्याला ।

परलोकीही ना भीती त्याला ।२

उगाची भितोसी भय हैं पळू दे ।

जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे ।

जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा ।

नको घाबरू । तू असे बाळ त्यांचा ।३

खरा होई जागा । श्रद्धेसहीत ।

कसा होशी त्याविन तू स्वामीभक्त ।

कितीदा दिला बोल त्यांनीच हात ।

नको डगमगू । स्वामी देतील साथ ।४

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ ।

स्वामीच या पंच प्राणामृतात ।

हे तीर्थ घे आठवी रे प्रचीती ।

न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ।५
 
धार्मिक महत्व :- 
स्वामी समर्थांची नगरी म्हणजे अक्कलकोट. अक्कलकोट हे स्वामी समर्थ भक्तामध्ये प्रसिद्ध आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर व त्यांच्या गावातील मठ आहे. मंदिराच्या अन्नछत्रांमध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे चार ते पाच हजार भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा खूप प्रसन्न आहे. अक्कलकोटचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील एक मोठे शस्त्रग्रह. येथे अनेक जुन्या परंपरागत शस्त्रांचा संग्रह आहे.
येथील भोसले राजघराण्याचे ऐतिहासिक शस्र प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे. वेगवेगळी तलवारी, ढाली, भाले, दानपट्टे, कुऱ्हाडी, बंधूका, खंजीर इत्यादी वस्तू प्रदर्शनात ठेवल्या आहेत.
या प्रदर्शनामध्ये येथील राजकन्येच्या लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रह देखील आहे. राज पुरुषांची सुंदर आणि रंगीत छायाचित्रे प्रदर्शनात मांडली आहे.
अक्कलकोटच्या जवळ शिवपुरी नावाचे ठिकाण आहे. तेथील पुजारी सकाळ संध्याकाळ हवन-यज्ञ आधी असतात. त्या हवनसाठी दूरवरून लोक येतात यावर संशोधन करण्यासाठी. आणि अनेक अभ्यास ही भेट देतात.
 
श्री स्वामी समर्थांचा अवतार व इतिहास :-
भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेक विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाच्या कल्याणा करता घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी अवतार घेतला. इसवी सन ११४९ मध्ये छेली खेडे या गावात पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रयांनी आगळावेगळा असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. असे सांगितले जाते की, २२९ वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर ब्रह्मण करीत होते. इ.स. १३७८ मध्ये पिठापूर आंध्रप्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन रूप धारण करून सुमारे दीडशे वर्ष अंधश्रद्धा दूर करून परमेश्वराची ओळख विश्वाला करून दिली.
अशाच महान कार्यामुळे देशातील श्रद्धाळू त्यांच्याकडे जाऊ लागले. 
असे सांगितले जाते की इ. स. १८७८ मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या देह संपविला. परंतु त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने चालू आहे. आणि ते श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा मार्गातून सुरू आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवीतो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतीमय बनवितात.

श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती व तत्व असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने  नित्यसेवा म्हणून रोज ११ माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. व श्री स्वामी चरित्र या पोथीचे दररोज तीन  किंवा सात अध्याय वाचून पारायण करावे.

 

!! श्री स्वामी चरित्र सारामृत : पारायण पद्धती !!
उत्तम फलप्राप्ती करिता ‘श्री स्वामी चरित्र सारामृत’ या पोथीचे पारायण कसे करावे हे सांगण्यात आलेले आहे.
  • दिनशुद्धी (उत्तम दिवस) पाहून श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण करावे.
  • श्री स्वामी समर्थांच्या भक्तीला सेवेला काळ वेळेचे बंधन नाही, परंतु पारायणासाठी शक्यतो सोमवार गुरुवार आणि शुभ दिवस हा उत्तम काळ समजून पारायण करावे.
  • दशमी एकादशी व द्वादशी या दिवशी पोथीचे तीन दिवसांचे पारायण करावे प्रत्येक दिवशी पोथीतील क्रमाने सात अध्याय वाचावेत.
  • ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे.
  • ज्या प्रमाणे आपली श्रद्धा भक्ती तसेच इच्छा नुसार श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण पोथीची पारायण करावीत.
  • सकाळी स्नानानंतर नित्यनियमाने देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे त्यासाठी वेळ निश्चित केल्यास उत्तम स्नानानंतर शुद्ध वसरे नेसून मस्तकी गंध लावावे.
  • रोज नित्याची देवपूजा करावी. कुलदेवता, गुरुदेव व श्री स्वामींचे स्मरण करावे.
  • वडीलधाऱ्यांना वंदन करावे.
  • पारायण प्रारंभ करताना पहिल्या दिवशी उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी व दिनांक व वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या हेतूने उद्देशाने व प्राप्तीसाठी हे पारायण करीत आहोत ते सांगावे.
  • परायणाला बसल्यावर मनामध्ये कोणते वाईट विचार, तिरस्कार किंवा दुसऱ्याविषयी द्वेष मनामध्ये आणू नये, तरच त्या पारायणाचा लाभ घेऊ शकता.
  • चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून त्यावर श्री स्वामींची तसबीर  व मूर्ती ठेवावी. भोवती  रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धुप, दीप नैवेद्य या गोष्टींनी श्री महाराजांची पूजा करावी.
  • आसनावर बसून श्रीमहाराजांना व पोथीला  वंदन करून तसेच अध्यायांचा अर्थ नीट समजून घेत शांतपणे वाचन करावे. त्या समय श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा मनात भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन चाललेले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा. वाचन झाल्यावर श्री स्वामींच्या तसबीरीला गंध, हळद-कुंकू, व फूल वाहावे. उदबत्ती व धूप-दीप ओवाळून वंदन करावे. त्यानंतर नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा
  • श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीच्या पारायणाची सांगता करताना ब्राह्मणास व ब्राह्मण दांपत्यास भोजन, वस्र व दक्षिणा देऊन सन्मान करावा.
  • ज्या दिवशी पारायणाची सांगता होईल त्या दिवशी सायंकाळी जवळपासच्या श्री स्वामी मठात किंवा मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यावे.

 

।। श्रीस्वामी चरित्र सारामृत : पारायणाची फलप्राप्ती ।।
श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे फलप्राप्तीसाठी या गोष्टी केल्या तर तुम्हाला सकारात्मक अनुभव येऊ शकतो.
१) रोग बरा होणे- ०७ पारायणे
२) विद्याभ्यासात प्रगती, परीक्षेत यश ०७ पारायणे
३) विवाह जमून निर्विघ्नपणे पार पाडणे एका दिवसात एक पारायण.
४) नोकरी मिळणे, व्यवसायात यश मिळणे ०७ पारायणे
५) स्थावर मालमत्तेची अडलेली महत्त्वाची कामे होणे ०७ पारायणे

 

!! आरती स्वामी समर्थांची !!
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था । आरती ओवाळू चरणी ठेवुनिया माथा ।। छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी । जगदुध्दारासाठी राया तू फिरसी । भक्तवत्सल खरा तू एक होसी । म्हणुनी शरण आलो तुमच्या चरणांसी ।।१।। जयदेव जयदेव  ।। त्रेगुण परब्रम्ह तुझा अवतार । त्याची काय वर्णू लीला पामर ।। शेषादिक शिणले न लगे त्यां पार । जेथे जडमूढ कसा करु मी विस्तार ।।२।। जयदेव जयदेव ।। अघटित लीला करुनी जडमूढ उध्द्वरिले । कीर्ती  ऐकुनि कानी । चरणी मी लोळे ।। चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले। तुझ्या सुता न लगे  चरणा वेगळे ।।४।। जयदेव जयदेव ।।

 

।। आरती स्वामी समर्थांची ।।
जयदेव जयदेव दत्ता अवधूता हो, स्वामी अवधूता ।। अगम्य लीला स्वामी त्रिभुवनि तुझि सत्ता ।। घृ०।। तुमचे दर्शन होता जाती ही पापे। स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते ।। चरणी मस्तक ठेवुनि मन समजा पुरते । वैकुंठीचे सुख नाही यापरते ।।१।। जयदेव जयदेव ।। सुगंध केशर भाळी वर टोपी टीळा। कर्णी कुंडल शोभति वक्षःस्थळि माळा ।। शरणागत तुज होता भय पडले काळा । तुझे दास करिती सेवा सोहळा ।।२।। जयदेव जयदेव ।। मानवरुपी काया दिससी आम्हांस। अक्कलकोटी केला यतिवेषे वास ।। पूर्णब्रह्म तोचि अवतरला खास। अज्ञानी दासांस अज्ञानी भक्तांस विपरीत हा भास ।।३।। जयदेव जयदेव ।। निर्गुण निर्विकार विश्व व्यापक । स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक ।। अनंत रुपे धारिसी करणे माईक। तुमचे गुण वर्णिता थकले विधि-लेख ।।४।। जयदेव जयदेव ।। घडता अनेक जन्म सुकृत हे गाठी। त्याची ही फलप्राप्ति सद्‌गुरुंच्या भेटी । सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी। शरणागत दासावरी करी कृपादृष्टी ।।५।। जयदेव जयदेव ।।
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

 

अक्कलकोट देवस्थानचे काही images…