new katraj tunnel नवीन कात्रज बोगदा
नवीन कात्रज बोगदा

 

नवीन कात्रज बोगदा, पुणे 

 

नवीन कात्रज बोगदा हा पुणे शहरातील कात्रज परिसरातील एक बोगदा आहे. पुणेबंगळूर महामार्गावरील जुन्या कात्रज घाटवाहतुकीसाठी अपुरा पडू लागल्यामुळे हा बोगदा बांधण्यात आला. प्रत्येकी जाण्यायेण्यासाठी तीन मार्ग असलेला ,३३८ मीटर लांबीचेदोन बोगदे राष्ट्रीय महामार्ग ४८ वर आहे. या दोन्ही बोगद्यांमधून लहानमोठ्या तसेच अवजड वाहने सुद्धा जाऊ शकतात.
सह्याद्री पर्वतरांगे मधुन हा महामार्ग गेला असल्यामुळे डोंगर रांग मोठी असल्यामुळे या बोगद्याची लांबी ,३३८ मीटर झाली आहे.हा बोगदा बांधल्यापासून वाहतूक करण्यासाठी फार सोपा झाला आहे. मोठ्या प्रमाणात जुन्या बोगद्यामध्ये  गर्दी होत असल्यामुळे याबोगद्याची निर्मिती करण्यात आली. आणि नवीन कात्रज बोगद्याचे उद्घाटन २००६ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केले.