गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ तसेच पर्यटन स्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात असलेलं हे एकअतिशय सुंदर मंदिर आहे.आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्रामुळे हे देऊळ आगळे वेगळे दिसते.गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते.
१ किलो मीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळाच्या झाडांमुळे अतिशय सुंदर दिसतो.या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने येथे पर्यटकांची अतिशय गर्दी असते.पर्यटक सुट्ट्यांमध्ये गणपतीपुळ्याच्या समुद्राला आवश्यक भेट देतात.
गणपतीपुळ्याला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेलं पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाचा इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळेह्या गावात गणेशोत्सव काळात गणपतीचीमूर्ती आणून पूजा केली जात नाही. कारण गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच या सर्व ग्रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे. त्याच रस्त्याला लागूनरत्नागिरीच्या दिशेने आरे-वारे हा सनसेट पॉईंट देखीलआहे.
दिवसेंदिवस गणपतीपुळ्यातील पर्यटकांची संख्या वाढत आहे. कारण तेथे आता मोठ्या प्रमाणात पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे. त्याचबरोबर खाण्यापिण्याची सोय, वाहनतळ, राहण्याची सोय, तसेच समुद्र किनारी घोडागाडी इत्यादी मनोरंजनासाठीविविध सोय करण्यात आलेली आहे.
मुख्यमंदिराला बाहेरून दोन रंग देण्यात आलेले आहे. सर्वात वरचा रंग पांढरा आहे. तर अर्ध्यापासून खाली लाल रंग देण्यात आलेला आहे. मंदिराच्या तसेच समुद्रकिनाऱ्याच्या मधोमध एक मंदिरा शेजारी कुंपण घालण्यात आलेले आहे. समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. तसेच समुद्रकिनारी पर्यटकांसाठी घोडा, उंट, चार चाकी गाड्या तसेच छोटी छोटी बोटी इत्यादी सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे.