संगणक Computer
Computer information in Marathi.

अनुक्रमणिका
-
संगणक म्हणजे काय (व्याख्या)
-
संगणकाचा परिचय
-
संगणकाचा इतिहास
-
संगणकाचा विकास
-
संगणकाचे प्रकार
-
संगणकाचे उपयोग
-
संगणकाचे फायदे
-
सॉफ्टवेर
-
हार्डवेर ( input device and output device )
-
नेटवर्किंग
संगणक म्हणजे काय (व्याख्या)
-
संगणक हे एक यंत्र आहे.
-
संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे.
-
संगणक हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती विश्लेषण, माहिती प्रक्रिया, व सांख्यिकी आकडेमोड करणारे एक उपकरण आहे.
-
विविध हार्डवेअर व विविध सॉफ्टवेअर एकत्र येऊन जे उपकरण तयार होते, त्याला संगणक असे म्हणतात.
-
संगणक हे मानवाने तयार केलेल्या उपकरणांपैकी एक खूप शक्तिशाली उपकरण आहे. त्याचा दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.
संगणकाचा परिचय.
संगणक तंत्रज्ञान हे क्षेत्र आता तसे खूप मोठे झाले आहेत. कित्येक लोकांनी या क्षेत्रात आपले नाव कमावले. ह्या क्षेत्रात मुख्य करूनअमेरिकेतले लोक जास्ती
आहेत. पण भारतातील तरुण सुद्धा या क्षेत्रात बहुसंख्येने आढळतात. आज कित्येक आयटी कंपन्या हेभारतीय लोक चालवतात. या क्षेत्राची आणि तंत्रज्ञानाची
सुरुवात कशी काय झाली? ह्यातले शोध कोठे आणि कसे लागले? हे तंत्रविकसित कसे झाले? याबद्दल अनेक वेळा आपल्या मनात कुतूहल असते.
त्याच प्रकारे आपण सगळेच हे तंत्रज्ञान आज अगदी रोज वापरतो. विविध क्षेत्रात संगणकाचा वापर केला जातो. आणि सगळेचकम्प्युटर सहज वापरतात. काहींना
त्याची तांत्रिक बाजू थोडी फार का होईना माहित आहे. बरेच जणांना त्याबद्दल जाणून घेण्याचीजिज्ञासा पण असते. संगणकामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे
मुख्य दोन प्रकार असतात. सॉफ्टवेअर मध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर आणि एप्लीकेशनसॉफ्टवेअर हे दोन भाग आहे. तसेच हार्डवेअर मध्ये इनपुट डिवाइस, इंटरनल
डिवाइस आणि आऊट डिवाइस हे तीन भाग असतात.
संगणकाच्या शोधामुळे मानवाच्या कामावरती ही परिणाम झाला आहे. जे काम मानव आपल्या हाताने करायचा तेच आता संगणकाद्वारेपूर्ण करतो. संगणकामुळे
जग खूप जवळ आले आहे. तसेच दूर अंतर असूनही त्यांच्या मधला संवादाही खूप जलद गतीने होऊ लागलाआहे.
संगणकाचा इतिहास
History of Computer in Marathi
संगणक आज सगळ्यात जास्त वापरले जाणारे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. संगणक एक आधुनिक यंत्र असून सुद्धा याची सुरुवात मात्र अतिशय साध्या पद्धतीने झाली. पूर्वी बेरीज वजाबाकी तसेच सोपी गणित सोडवण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करण्यात येत असे. संगणकाचा शोध लागला व मागील काही वर्षात या क्षेत्रात प्रचंड संशोधन झाले. संगणक विविध औद्योगिक आणि ग्राहक उपकरणासाठी नियंत्रण प्रणाली म्हणून वापरले जातात.
यामध्ये calculator आणि remote control तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये रोबोट्स आणि संगणक सहाय्यक डिझाईन सारखी उपकरणे आणि वैयक्तिक संगणक आणि स्मार्टफोन सारख्या मोबाईल डिव्हाईस सारख्या सामान्य हेतूची साधने यासारख्या खास साधनांचा समावेश होतो.
सुरुवातीच्या काळामध्ये मुख्य म्हणजे बोटांनी एक ते एक मोजमाप करून व्यवहार केला जात असे, म्हणूनच हि पद्दत फार जुनी होती. त्या नंतरच्या काळात एक लाकडी पोकळ ठोकला बनवून त्यामध्ये लोखंडी सळया बसवत असे आणि या सळयामध्ये मातीचे गोळे, शंकू इत्यादी भरण्यात येत असे. आणि मोजमाप केलं जात असे.
Z3 Computer (संगणक)

History of Z3 Computer in Marathi
नमस्कार, आपण Z3 या कम्प्युटर म्हणजे संगणकाची माहिती पाहणार आहोत. जर्मनीतील शास्त्रज्ञ कोनराड झ्यूस यांनी १९३६ साली Z सिरीज प्रकारचे कॅल्क्युलेटर्स तयार केले. ज्यामध्ये प्रथमच मेमरी म्हणजे साठवणुकीची सुविधा होती. या प्रकारांमधील Z3 हा संगणक त्यांनी १९४१ मध्ये विकसित केला व तोच पहिला पूर्ण उपयोगिता व इन्स्ट्रक्टर कंट्रोल्ड म्हणजे विशिष्ट आज्ञांवर विशिष्ट काम करणारा असा डिजिटल कम्प्युटर ठरला. या सुमारास म्हणजे १९४० च्या दशकात बेल प्रयोग शाळेत जॉर्ज स्स्टिबिट्स यांनी तयार केलेला कॉम्प्लॅक्स नंबर कॅल्क्युलेटर खूपच प्रसिद्ध झाला. या यंत्रामध्ये बायनरी नंबर साठी एक इलेक्ट्रॉनिक सर्किट होते. हे उपकरण टेलिफोन लाईन चा वापर करून दुरूनही वापरता येत होते. ४५० टेलिफोन लाईन्स वापरून आठ अंकी संख्यांचा गुणाकार व भागाकार या यंत्राद्वारे करता येत असे.
ENIAC : इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर हा संगणक १९४३ ते ४५ दरम्यान विकसित झाला. मेकॅनिकल पार्टस न वापरता तयार झालेला हा संगणक होता. विविध गणिती प्रक्रिया सोडवण्यास वेगवेगळे जोड करावे लागत असे. यामध्ये सुमारे १८,००० ट्यूब्जचा वापर केला गेला होता. हा संगणक एखाद्या पूर्ण खोलीतका आकाराने मोठा होता. हा संगणक सेकंदाला ५,००० बेरीज वजाबाकी करू शकत होता. तसेच त्यामध्ये गुणाकार भागाकार व वर्गमूळ काढणे आधी प्रक्रियांचा समावेश केला गेला होता. या Z सिरीज संगणकामुळे त्या काळामध्ये औद्योगिक क्रांती घडवून आली होती आणि त्या सुमारास संगणकाची रचना सुरू झाली. परंतु हा संगणक आकाराने खूप मोठा असल्यामुळे याची देखभाल करण्यासाठी खूप लोकांची गरज पडत होती. खर्च खूप लागत असे.
Transistor ट्रान्झिस्टर

History of Transistor in Marathi
इलेक्ट्रॉनिक युगाची सुरुवात ज्या शोधामुळे झाली ते दोन शोध म्हणजे ट्रान्झिस्टर आणि धातूच्या अतिसंवाकतेचा सिद्धांत. या दोन्ही शोधांचे जनक आहेत प्रसिद्ध अमेरिकन वैज्ञानिक Dr. जॉन बारदिन ट्रान्झिस्टर हे एक अतिशय लहान उपकरण असून त्याचा वापर संगणक, मोजणी यंत्र, म्हणजेच कॅल्क्युलेटर, रेडिओ, दूरचित्रवाणी इत्यादी मध्ये करण्यात येतो. ट्रान्झिस्टर चा शोध लागण्यापूर्वी एका नळीचा वापर या उपकरणांमध्ये केला जात असे, त्यामुळे ही उपकरणे खूप अवजड आणि बोजड बनत होती. या ट्रान्झिस्टर नामक छोट्या उपकरणाचा शोध लागल्याने या उपकरणांमध्ये क्रांती झाली. पॉकेट कॅल्क्युलेटर, अतिगतिमान संगणक, बॅटरीवरील रेडिओ तसेच दूरचित्रवाणी संच आधी उपकरणे आधुनिक पद्धतीने तयार केली जाऊ लागली. ट्रान्झिस्टर चा आकार त्याच्या संरक्षण आवरणासहित पेन्सिल बरोबरच्या रबराएवढा होतो. या उपकरणामधील विद्युत प्रवाह नियंत्रित ठेवण्याचे काम ट्रांजिस्टर करतात. विद्युत प्रवाहातील चढउतारवर नियंत्रण झाल्याने वरील वस्तूंमध्ये वारंवार बिघाड होत नाही. तसेच ही उपकरणे चालविण्यास खर्चही कमी येतो.
वजनाने हलके असल्याने तसेच ते आकारानेही लहान असल्यामुळे त्यांचा उपयोग उपग्रहाद्वारा संपर्क वाढविण्यासाठी फारच उत्तम रीतीने होतो. हे उपग्रह दूरचित्रवाणी व भ्रमणध्वनी या माध्यमांना जोडले जाते. ट्रान्झिस्टर चा शोध Dr. जॉन बारदिन यांनी आपल्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत १९४८ साली लावला. त्यांच्या या शोधामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये मोठी क्रांती घडून आली. या शोधाबद्दल त्यांना १९५६ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले. Dr. बारदिन यांनी बनवलेल्या या ट्रांजिस्टर चे वर्णन मूर्ती लहान पण कीर्ती महान असेच केले पाहिजे.
IBM Computer (संगणक)

History of IBM 701 Computer Marathi
सन १९४८ च्या सुमारास स्टोअर प्रोग्रॅम कंट्रोल्ड संगणकांनी क्रांती घडविली, पण त्यामध्ये एक अडचण अशी होती की, जर तुम्हाला तुमच्या एखाद्या प्रश्नासाठी म्हणजेच कामासाठी हा संगणक वापरण्याची इच्छा झाली. तर तो तुम्हाला स्वतःला तयार करावा लागत असे. संगणकाच्या व्यापारी उत्पादन करणाऱ्या कंपन्या त्यावेळी अस्तित्वात नव्हत्या. ज्यावेळी खूप लोकांनी संगणकाबद्दल विचारण्यास सुरुवात केली, त्यावेळी मात्र व्यापारी तत्त्वावर मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येईल का, याचा गांभीर्याने विचार होण्यास सुरुवात झाली होती.
यामध्ये अग्रगण्य होती ती म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स आयबीएम कंपनी आयबीएम ७०९ हा या कंपनीचा व्हॅक्युम ट्यूब वापरून तयार केलेला संगणक होता. १९५८ साली ट्रान्झिस्टर असलेल्या संगणकाची घोषणा करण्यात आली. विकल्या गेलेल्या १७ आयबीएम ७०१ संगणकापैकी ७ संगणक विमाने बनवणाऱ्या कंपन्यांनी विकत घेतले होते. त्यानंतर तयार केलेला आयबीएम ७०२ हा मात्र कार्यालयीन कामकाजासाठीचा उद्देश समोर ठेवूनच निर्माण केला गेला. बँक ऑफ अमेरिका या जगप्रसिद्ध वित्त संस्थेने व मोटार उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या फोर्ड या दोघांनी तो विकत घेतला. व मोठ्या प्रमाणात वापरला. त्या पाठोपाठ आयबीएम ७०३ ७०४ ७०५ ७०६ अशी एक मागून एक यशस्वी संगणकाची मालिकाच आयबीएनने तयार केली.
पंचेस कार्ड

संगणक पंचेस कार्डचा इतिहास?
History of computer Punched cards in Marathi?
कॅल्क्युलेटर फक्त सांख्यिकी आकडेमोडच करतात. म्हणजेच न्यूमरिकल म्यॅनिप्युलेशनच करू शकत असत. पण गणिती प्रक्रियाबरोबरच असे एखादे यंत्र विकसित करता येईल का जे गणिती प्रक्रियाबरोबरच शब्दांवरील प्रक्रिया करू शकतील, यावर जगभरातील शास्रज्ञ संशोधन करीत होते. यातूनच ‘पंचेस कार्ड’ म्हणजेच एकाच आकारातील विविध ठिकाणी आणि विविध पद्धतीने भोके असलेली पट्टी म्हणजेच तक्त्याची निर्मिती झाली.
आता हे तक्त्ते कोणतीही माहिती अगदी शब्दसुद्धा साठवून ठेवू शकत होते. या पट्टया कार्ड रीडर नावाच्या यंत्रामद्ये सरकावून त्या पट्टयांवर सांकेतिक मजकूर वाचून त्यावर प्रक्रिया करत असे. पाश्चिमात्य देशांत ही यंत्रे मोठ्या प्रमाणात वापरू जाऊ लागली. एक ऑपरेटर या प्रकारची सातशे कार्ड प्रोसेस करू शकत होता. म्हणजेच मानवापेक्षा दहापटीने जलद गतीने. ही पंच कार्ड्स खूपच प्रसिद्ध होऊ लागली. पण या पट्ट्यांची लांबी-रुंदी किती असावी, होलांचा आकार किती असावा याबद्दल कोणतेच प्रमाण नव्हते. ‘आबम’ या जगप्रसिद्ध कंपनीने १९२८ मद्ये ८० रकान्यांची रुंदी असलेली व चौकोणी भोके असलेली कार्ड सिस्टम आणली होती.
इलेकॅाम – ५० संगणक
इलेकॅाम – ५० संगणकाचा इतिहास
History Of Elecom Computer in Marathi
आयबीएमच्या मालिकेमधील सर्व संगणक अतिशय मोठ्या आकाराचे होते. काहींना बनविण्यात व ठेवण्यात संपूर्ण इमारतच लागत होती. आणि हे सर्व संगणक महागड्या स्वरूपाचे असल्यामुळे शासकीय कार्यालये तसेच, मिलिटरी कार्यालये, मोठ-मोठ्या कंपन्या, संशोधन केंद्रे यांनाच हे संगणक परवडत असे आणि वापरला जात असे. आकाराने छोटे व स्वस्त संगणक अनेक लोकांपर्यंत पोहचू शकत होते. मात्र ते उपलब्ध नव्हते.
त्याच बरोबर ह्या संगणकांना चालवण्यासाठी अनेक माणसे कामावर ठेवू लागत असे आणि त्याचमुळे खूप मोठा खर्च होत होता. आणि काही वर्षातच इलेकॉम नावाची १९४७ मध्ये स्थापन झालेली कंपनी आपल्या इलेकॉम-५० या एका टेबलाच्या आकाराच्या व्हॅक्युम ट्यूबवर आधारित यंत्राद्वारे बाजारात उतरली होती. ह्या संगणकांना मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी मागणी वाढू लागली. हे यंत्र मात्र आकाराने छोटे असल्यामुळे कार्यालयातील लोकांचे पगारपत्रक तयार करणे इतर कामे तयार करत असे.
बेडिक्स जी- १५ संगणक

बेन्डिक्स जी – १५ संगणकाचा इतिहास
History of Bendix G-15 Computers in Marathi
विमानाचे सुटे भाग तयार करणाऱ्या बेडिक्स नावाच्या कंपनीने छोट्या संगणकाच्या उत्पादनात उतरायचे ठरविले. त्यांनी आणलेला जी-१५ नावाचा संगणक खूपच यशस्वी ठरला. असे सांगण्यात येते कि सुमारे ५० हजार डॉलर्सना उपलब्ध असलेल्या व फक्त ८५० पौंड वजन असलेल्या या संगणकाचे ३०० ग्राहक बनले होते. फिरत्या चुंबकीय चकत्यांवर मुख्य मेमरी असे. या सर्व संगणकांच्या वापरासाठी वातानुकूलित यंत्रणेची गरज असे.