डिंभे धारण

 

डिंभे धरण, आंबेगाव पुणे
डिंभे धरण हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोड नदीवर बांधण्यात आलेले आहे. याचे बांधकाम इसवी सन १९७८ मध्ये सुरू करण्यात आले होते. या धरण क्षेत्रांमध्ये आंबेगाव, वचपे, कोलतावडे, पांचाळे, कळंबई, दिगद, मेघोली, कुशीरे,  म्हाळुंगे, दिंभे, फुलवडे ह्या गावांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे.
डिंभे धरणामुळे स्थानिक लोकांना मासेमारीचा एक उत्तम पर्याय उपलब्ध झालेला आहे. तसेच मासेमारीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार सुद्धा तयार झाला आहे. डिंभे धरणामध्ये मासेमारी आधुनिक पद्धतीने केली जाते.
धरणाचे काम अतिशय मजबूत करण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणाहून धरणाचे पाणी सोडले जाते त्याच समोर एक मोठा पूल बांधण्यात आला आहे.