भात शेतीसाठी गाळ करणारा ट्रॅक्टर.

 

Small tractor
भात शेतीसाठी गाळ करणारा ट्रॅक्टर.
नमस्कार,
आज आपण भात शेतीसाठी गाळ कसा केला जातो, ते पाहणार आहोत. भातशेतीसाठी मोठ्या प्रमाणात गाळ करावा लागतो. जेणेकरून भात लावणे खूप सोपे जाते. आणि तो गाळ  बैलांनी त्याच प्रमाणेट्रॅक्टरने सुध्दा केला जातो. आज आपण ट्रॅक्टर द्वारे गाळ कसा केला जातो. ते पाहणार आहोत.
गाळ केल्याने भात लावणे खूप सोपे जाते. ट्रॅक्टर पूर्ण शेतामध्ये फिरवला जातो. तसेच ट्रॅक्टरच्या पाठीमागच्या दोन्ही मोठ्या चाकान्नालोखंडी चाके बसवले जातात, जेणेकरून ट्रॅक्टर चिखलामध्ये अडकू नये. भातशेतीसाठी छोट्या ट्रॅक्टरांची निवड केली जाते. कारणवजन कमी असल्यामुळे अडकण्याची शक्यता कमी असते. ट्रॅक्टरच्या पाठीमागे लोखंडाचे यंत्र बसवलेले असते. त्या यंत्राद्वारे चिखल केला जातो. चिखल करण्यासाठी या यंत्राला  लोखंडाची पातीलावलेली असते.