मनाचे विचार
नमस्कार,
मनाचे विचार या विषयावर बोलणार आहोत . विचार ही एक अशी शक्ती आहे , ज्याच्या बरोबर तुम्ही जग जिंकू शकता . तुम्हाला जर जगात चांगला माणूस व्हायचा असेल , तसेच तुमचं कार्य जगाला दाखवायचं असेल तर योग्य विचार करणे फार महत्त्वाचे आहे .
एका दिवसामध्ये माणसाच्या मनात हजारो विचार येतात . जे विचार सकारात्मक असेल तर तुम्हाला सकारात्मक अनुभव येतो . आणि तेच विचार जर नकारत्मक असले तर वाईट परिणाम दिसून येतात . म्हणून माणूस जसा विचार करतो , तसे त्याचे जीवन असते . समोरची व्यक्ती जर तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल , तसेच तुमचा तिरस्कार करत असेल , आणि तुमची बदनामी करत असेल तर समजून घ्यायचे की आपल्याबद्दल समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये वाईट विचार आहे . म्हणून तो तसा तुमच्या बरोबर वागतो .
समोरच्या वेक्तीला पाहिल्यावर राग येतो . आजचा दिवस अशुभ आहे . मला यश मिळणार नाही . माझ्या हातून खूप चुका होत आहेत . मला चांगली संधी मिळत नाही . सर्व माझ्या विरोधात आहे . हे नकारात्मक विचार माणसाच्या दुःखाला कारणीभूत असतात . यामुळे निराशा वाढते . उत्साह कमी होत जातो . आत्मविश्वास कमी होतो . या सर्वांचा परिणाम तुमच्या शरीरावर होतोच पण तुमच्या सुखी जीवनाला धोका निर्माण होतो . त्यामुळे माणूस आजारी पडू शकतो . आणि नैर्राष्य सुद्धा येते . त्यामुळे सकारात्मक विचार करायला हवेत .
जास्त प्रमाणात आपण दैनंदिन जीवनामध्ये सकारात्मक विचार करू , तेवढे तुमचे जीवन एक सुखी होत जाते . आणि त्याचबरोबर एक जगण्याचा नवा मार्ग सापडतो . आणि इतरांना सुद्धा तुम्ही उत्साह देण्याचा प्रयत्न करू शकता . त्यामुळे सकारात्मक विचार फार महत्त्वाचे असतात . जर तुम्हाला वाटत असेल की मी खूप गरीब आहे . माझ्याकडे पैसे नाही . किंवा मला कोणी मदत करत नाही . तर ही चूक तुमचीच आहे . कारण तुम्ही सतत नकारात्मक विचार करता , त्यामुळे तुम्हाला यश मिळत नाही . आणि तुम्ही दोष दुसऱ्यावर ढकलून मोकळे होता . या कारणांमुळे तुमची प्रगती होत नाही .
तुम्हाला जर चांगली माणसे आणि वाईट माणसे ओळखायचे असेल तर , त्या व्यक्तीबरोबर १५ ते २० मिनिटं बोला तर तुम्हाला त्यांच्या बोलण्यातून त्यांचे विचार समजतील . आणि त्याचबरोबर त्याचा स्वभाव कसा आहे . ही व्यक्ती आपल्यासाठी धोक्याची आहे की नाही हे लगेच समजून जाईल .