मन शांत ठेवणं.

 

नमस्कार 
 आज आपण मन कस शांत ठेवलं पाहिजे ते पाहणार आहोत.
आणि त्याचबरोबर मन शांत असलं की आपल्याला कोण कोणते फायदे होऊ शकतात. तसेच मनावर ताबा असल्यामुळे आपलाताणतणाव कसा कमी करता येतो, त्याच बरोबर रागावर सुद्धा आपण ताबा ठेवू शकतो. आणि एक सुखी जीवन जगू शकतो. तेपाहणार आहोत.
जर तुमच्या मनावर तुमचा ताबा असेल तर तुम्ही तुमच्या जीवनातल्या  कोणत्याही अडचणीवर मात करू शकता. आणि योग्य वेळीयोग्य निर्णय घेऊ शकता. त्यामुळे तुमचा तुमच्या कुटुंबाचा फायदा होऊ शकतो. मन शांत ठेवण्याची सुद्धा एक कला असते. ती कला  प्रत्येकाने समजून घेणे महत्त्वाचे असते.
प्रत्येकाने आपल्या जीवनातील शांत मनाच्या वक्तींचे निरीक्षण केलं तर, तुम्हाला असं समजून येईल की, समोरच्या व्यक्तीचा किंवाचालू असलेल्या वाईट परिस्थितीचा त्या वेक्तीवर काहीच परिणाम दिसून येत नाही. आणि ती व्यक्ती कधी दुसऱ्यावर अवलंबून राहतनाही. स्वतःचे निर्णय स्वतःच घेते.
शांत मनाची माणसे कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये आपल्या स्वतःच्या विचारावर ठाम असतात. आणि ते नेहमी सुखी आणिसमाधानी असतात. तुम्ही पाहिलं असेल की आत्ताच्या जीवनामध्ये माणसे खूप दुःखी आणि निराश दिसतात. आणि याच गोष्टीमुळेआपलं सुंदर आयुष्य गमावतात.
आणि एक सुखी जीवन त्याचबरोबर एक समाधानी आयुष्य जगायचं असेल तर, मन शांत ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. जेणेकरून तुमच्याचालू जीवनावर एक चांगला प्रभाव पडू शकतो. शांत मनाच्या व्यक्तींचे निर्णय कधीच चुकत नाही. म्हणून मनाला कधी विचलित होऊदेऊ नका. कारण तुमचं मन विचलित झालं तर तुमचं आयुष्य सुद्धा विचलित होतं. आणि त्याचे दुष्परिणाम तुमच्या कुटुंबावर होतात. तसेच समाजाला सुद्धा त्याचा दुष्पपरिणाम भोगावा लागतो.
तुम्ही पाहिलं असेल की समाजामध्ये किती वाईट माणसे असतात. ते तुमचं वाईट करण्यासाठी खूप प्रयत्न करीत असतात. परंतु शांतमनाची माणसं ते त्यांचं बोलणं दुर्लक्षित करतात आणि आपल्या स्वतःच्या मनावर ठाम असतात.
म्हणूनच मन शांत ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे योग्य निर्णय योग्य आयुष्य घडवत असतात. आणि  त्याचबरोबर शांत मनाच्याव्यक्ती वाईट आणि चांगल्या व्यक्ती लवकर ओळखू शकतात.