“गांजा भाई आणि पप्पू भाई”

एक गाव होतं, छोटंसं पण गजबजलेलं, त्या गावात दोन कुख्यात गुंड राहत होते. एकाच नाव होतं गांजा भाई, तर दुसऱ्याचं नाव होतं पप्पू भाई. या दोघांमधली दुश्मनी जुनीच होती. अगदी लहानपणापासूनची. गावात कोणी नवीन माणूस आला की, त्याला आधी समजावलं जायचं “इथं दोन भाई आहेत पण एकमेकांच्या जीवावर उठलेले”
गांजा भाई गावातल्या जुन्या वाड्यात राहत असे. त्याचं वागणं शांत, पण डोळ्यांत कायम खतरनाक चमक. तो गावातल्या वाड्यावर नेहमी आपल्या गुंडांना घेऊन बसत असे. लोक त्याला घाबरून राहायचे.
पप्पू भाई याच्या उलट, थोडा गोंधळखोर, पण धाडसी, त्याचं एक स्वतःचं टोळकं होतं. तो त्यांच्यासोबत सतत गावभर हिंडायचा, कुणालाही काही झालं तर पप्पू भाई तिथं हजर,
एकदा गावात नवीन सरपंच आल्या. सविता ताई तिने ठरवलं की गावात शांती आणायचीच. तिने दोघांना बोलावलं आणि ठणकावून सांगितलं – “तुमचं दुश्मनी पुरे…… आता गावात एकच भाई – आणि तो म्हणजे गावभाई,म्हणजे सर्व लोक”
गांजा भाई आणि पप्पू भाई दोघंही गोंधळले. थोडा वेळ शांतता पसरली. पण मग एक दिवशी गावात चोर शिरले. हे चोर गावातली शाळा आणि अंगणवाडी लुटायला आले होते. तेव्हा पहिल्यांदाच, गांजा भाई आणि पप्पू भाई एकत्र लढले.
गांजा भाईने चोरांवर जोरदार हल्ला केला. तर पप्पू भाईने त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केलं. गावात जल्लोष झाला. त्या दिवसापासून दोघंही “भाई” न राहता, “भाऊ” झाले – गावाचे रक्षक.
शिकवण: दुश्मनी कितीही जुनी असली, तरी योग्य कारणासाठी माणसं एकत्र येऊ शकतात.