सह्याद्रीच्या कुशीत कोकणात राहणाऱ्या निसर्गरम्य कोकणी माणसाचे आणि सण-उत्सवांचे एक अतूट नाते आहे. शिमगा आणि गौरी गणपती हे दोन सण कोकणवासीयांच अतिशय जवळीक सण आहे. कोकणातली माणसे आपलं गाव सोडून कितीही दूरवर असले तरी, वेळात वेळ काढून या दोन सणांना आवर्जून आपल्या गावी येतो. मकर संक्रात आणि मार्लेश्वर यांचे सुद्धा असेच अतूट नातं आहे. आंबा घाटाच्या पायथ्याशी सह्याद्रीच्या कुशीत वसलेला देवरुख परिसर नितांत रमणीय आणि अतिशय सुंदर आहे. तसे पाहिले तर टिकलेश्वर, भवानी गड, मैमतगड, कुंडी घाटाचा जुना व्यापारी मार्ग अशी अनेक ऐतिहासिक स्थळे या परिसरात दिसून येतात. मारळ गावचे मार्लेश्वर हे सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण सुद्धा तिथेच आहे. मार्लेश्वर मंदिर म्हटले की तिथला प्रचंड मोठा धबधबा, गुहेमधील महादेव आणि नाग सापांची गोष्टी ऐकालया मिळतात, तसेच धबधब्याकडे जाताना मोठमोठी दगडी पाहायला मिळतात.
देवरुखपासून १२ कि.मी. असलेल्या मार्लेश्वर आणि मकर संक्रातीचा जवळचा संबंध आहे. १४ जानेवारी म्हणजे संक्रांत, हा मार्लेश्वरचा उत्सवाचा दिवस या दिवशी मार्लेश्वरचा विवाहसोहळा असतो. साखरप्याच्या गिरीजादेवीशी मार्लेश्वरचा विवाह या संक्रातीच्या दिवशी असतो. या दिवशी वेगवेगळ्या गावातून देव देवतांच्या पालख्या येतात. जवळच असलेल्या आंगवली गावात मार्लेश्वर प्रथम प्रकट झाले म्हणून या गावातील मार्लेश्वर मंदिरातून देवासाठी चांदीचा मुकुट येथे आणला जातो. या सोहळ्याच्या निमित्ताने लाखो भाविक येथे दर्शनाला येतात. यावेळी जेवणाची तसेच औषध पाण्याची मोफत सुविधा केली जाते. मार्लेश्वर मंदिराविषयी एक सुंदर दंतकथा पंचक्रोशीत सांगितले जाते. ती म्हणजे भगवान परशुरामाने देवरुखचा वाडेश्वर, संगमेश्वरचा कर्णेश्वर आणि मरळचा मार्लेश्वर यांची स्थापना केली. असे भक्तांमध्ये सांगितले जाते.
दुसरी दंतकथा अशी सांगितली जाते की, शिलाहारवंशीय राजवट उद्ध्वस्त होऊ लागली. पैसा आणि जहागिरीच्या लोभामुळे लोकं नाती विसरली आणि एकमेकांचा जीव घेऊ लागले. श्री मार्लेश्वर हे सगळे सहन होयला अवघड होऊ लागले. देव देवळातून बाहेर पडला. आणि दऱ्या-कपाऱ्यात हिंडू लागला. शांत निवांत स्थळ शोधू लागला. देव अंधारात राणे वने तुडवीत होता.शक्य गोष्टी अशक्य वाटू लागल्या. गावाबाहेर एका झोपडीत शिवाचे नामस्मरण करीत आयुष्य जगणाऱ्या एका चर्मकाऱ्याने अंधारातून वाट तुडवणाऱ्या देवाला दिवटी घेऊन वाट दाखवली. मुखी शिवनाम घेत जाणाऱ्या त्या चर्मकाऱ्याला देवाने मार्लेश्वरच्या गुहेशी आल्यावर निरोप दिला. त्यानंतर असं सांगण्यात येते की दुसऱ्या दिवशी देवळातून देव गायब झाल्याचा बोभाटा झाला. आपण गावकऱ्यांच्या त्रासाला कंटाळून देऊळ सोडून डोंगरात राहिलो आहे. असा दृष्टांत पुजाराला झाला. लोकांनी बराच शोध घेऊन देव सापडला नाही. पुढे गावावर रोगराई जुलमी आक्रमणे अशी अनेक संकटे कोसळली आणि नंतर काही काळाने सावंत, साळुंखे घराण्यातील काही मंडळींनी गावातील सगळ्या जाती-जमातीच्या लोकांना एकत्र करून परक्या आक्रमनांना लढाई करून पळून लावले. हे युद्ध ज्या ठीकाणी घडलं आणि शत्रूला कंठ स्नान घातलं ती जागा ‘मारलं’ या नावाने प्रसिद्ध झाली.
आणि पुढे काही कालांतरानंतर इ. स. १८ व्या शतकाच्या सुमारास अंगवलीचे सरदार अणेराव साळुंके शिकारीला गेले असता एका प्राण्याचा पाठलाग करत करत घनदाट जंगलात गेले एका लहानगुहेच्या तोंडातून तो प्राणी आत गेलाआणि ते त्या गुहेत गेले तेव्हा त्यांनी तेथील माती बाजूला करून त्यांना श्री महादेवाच्या पिंडीचे दर्शन झाले. साळुंके सरदारांना जाणवले की हाच तो श्री मार्लेश्वर देव. आणि ज्या दिवशी ह्या पिंडीचे दर्शन झाले तो दिवस होता मकर संक्रातीचा. महादेवाच्या पुनर्भेटीचा हा सोहळा मकर संक्रातीला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या उत्साहात साजरा करतात. मार्केश्वरच्या गुहेपाशी जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहे. जाताना वाटेमध्ये वस्तूंची दुकाने दिसतात. निसर्गाच्या एन कुशीत असलेले हे स्थान मोठे रमणीय आहे. मार्लेश्वरची गुहा डोंगरावर आहे. गुहे पाशी आल्यावर आजूबाजूचा नजारा पाहून थकवा निघून जातो. बाजूच जंगल हे साग, फणस, एनाच्या वृक्षांनी बहरलेले आहे.
मंदिराच्या पाठीमागे कोसळणाऱ्या धबधब्यामुळे इथले सगळे वातावरण आनंदी होते. ह्या धबधब्याच्या वरती सुद्धा डोंगरात अजून धबधबे आहेत. पावसाळ्यात धबधब्याचे रौद्र स्वरूप अनुभवता येते. पावसाळ्यामध्ये पर्यटक सुद्धा श्री मार्लेश्वर मंदिराला तसेच धबधब्याला आवर्जून भेट देतात.