रक्षाबंधन

 

Rakshabandhan | Rakhi | रक्षाबंधन
Rakshabandhan | Rakhi | रक्षाबंधन

 

रक्षाबंधन हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे. तसेच भावाबहिणीच एक पवित्र नात्याचा सण आहे. जो दक्षिण आशिया तसेचजगाच्या इतर भागांमध्ये विशेष  हिंदू समाजामध्ये साजरा केला जातो. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावाच्यामनघटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोरा बांधतात. ही राखी त्यांच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानलेजाते. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतात. रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील  श्रावण महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये येतो.  रक्षाबंधन शब्द हा कसा तयार झाला तर संस्कृत मधीलअर्थसंरक्षण बंधन किंवा काळजीअसा होतो. बहिण भावाचा हा सण ज्याचा उगम लोकसंस्कृतीमध्ये झाला.
हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्यादिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सणबहिण भावाच्या अतूट पवित्र प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. भावाचं कल्याण व्हावं, तसेच आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामनेचा हेतू असतो . रक्षाबंधनाच्या दिवशीबहिण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावाचं  दीर्घ आयुष्य सुख लाभो मिळो अशी कामना करते. राखीबांधण्याचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीची  जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह परस्पर प्रेम तसेच एक पवित्र नातंतयार होण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.
रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. बहीण या दिवशी भावालाओवाळून त्याच्या  हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयमआणि साहस  निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भाऊ बहिणीचे नातं.
राखीह्या शब्दातचरक्षण करराख म्हणजे सांभाळहा संकेत आहे.