Wade Bolhai Temple Pune History and Information in Marathi.
नमस्कार, मी राहुल
आज मी तुम्हाला पुणे जिल्यातील प्रसिद्ध श्री वाडे बोल्हाई देवी मंदिराची माहिती सांगणार आहे.
वाडे बोल्हाई मंदिर हे पुणेकरांसाठी एक जिव्हाळ्याचं धार्मिक स्थळ आहे. ह्या मंदिराला दरोरोज हजारो भाविक भेट देतात. असा एक पण पुणेकर नसेल की त्याने या मंदिराला भेट दिली नसेल.
वाडे बोल्हाई हे पुण्याजवळील एकप्रसिद्ध धार्मिक स्थान आहे. पुणे जिल्ह्यातील स्थानिक लोकांची बोल्हाई देवीवर खूप श्रद्धा आहे. म्हणून दरवर्षी भावीक देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. या मंदिरामागे एक तळे आहे.इंग्रजांच्या काळात लष्कर विभागास पाणी उपलब्ध व्हावे म्हणून इंग्रजांनी बोल्हाई मंदिरा माघील तळे खोल व रुंदकेल्याची नोंदी आहे. या नोंदीमध्ये बोल्हाई मंदिराचा उल्लेख आढळतो. हे मंदिर त्याही पूर्वीचे आहे असे दिसून येते.
देवी समोर सिंह व जवळ महिषासुरमर्दिनी, तसेच खोकलाई, खरजाई, मारुती या देवतांची मूर्ती आहे. देवीची मूर्ती म्हणून फक्त चेहरा आहे. आणित्यावरील भाव प्रसन्न दिसतात. देवीच्या चेहऱ्यावर शेंदूर लावण्यात आलेला आहे. आणि कपाळावरती गोलाकार कुंकू लावण्यात आलेल आहे.
मुख्य मंदिराबाहेर भगवान शिव शंकरांची मूर्ती आहे. तसेच त्यांच्या हातामध्ये एक पिंड आहे. आणि शेजारीस एक नंदी आहे. आणि बाजूलाच भगवान श्रीकृष्ण बासुरी वाजवताना दिसत आहे. मुख्य मंदिराच्या चारी बाजूने एक मोठी भिंत बांधण्यात आलेली आहे.
बोल्हाई देवीला नवस केलेला पूर्ण करण्यासाठी भावीक येथे येऊन जत्रा करतात. मुख्य मंदिराच्या बाहेरीलबाजूस जेवणाची पंगत बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की अंगावरील खाज, खरूज, नायटा, काळे चट्टे किव्हा पांढरे चट्टे निघून जाण्यासाठी बोलाई देवीला जाऊन तेथील तळ्यातील पाणी अंगावर घेतल्यामुळेदूर होते.
तळ्यामध्ये उतरण्यासाठी दगडाच्या पायऱ्या केल्या आहे. काही भावीक तळ्यामध्ये जाऊन तोंड,हात,पाय धुतात तर काही भाविक बादलीमद्ये पाणी घेऊन वरती आल्यावर तोंड, हात, पाय धुतात आणि ज्या भाविकांना बोल्हाई देवीला एयला जमले नाही, अशांसाठी येथून पाणी घरी घेऊन जातात.
मुख्य मंदिराच्या बाहेरील तिन्ही बाजूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील काही चित्रे रेखाटली आहे. त्यामध्ये औरंगजेबाचा वध करताना तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झालेली दाखवली आहे .अशा कित्येक चित्रे या भिंतीव्वर काढलेली दिसून येतात. मुख्य मंदिरा बाहेर पत्र्याचं छत आहे. भाविकांना उन्हापासून तसेच पावसापासून कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली आहे. मंदिराच्या बाजूच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी घटनांच्ये चित्रे काढण्यात आलेली आहे. एक भक्तांच्या समोर आदर्श ठेवण्यात आलेला आहे.
काही भाविक तर दर महिन्याला तसेच दर वर्षीं नित्य नियमाने दर्शन घेण्यासाठी येतात. ज्यांनी नवस केलेला असतो ते नवस फेडण्यासाठी येतात आणि जत्रा ही करतात. आत्ताचे मंदिर पाहिले तर नवीन दिसेल परंतु २५ ते ३० वर्षांपूर्वी हे मंदिर हेमाडपंती शैली मद्ये होते. आणि आत्ताचा पाण्याचा तलाव दगडी बांधकामांमद्ये दिसतो पण काही वर्षांपूर्वी या तलावामद्ये चारीही बाजूंनी उतरता येत होते. मुख्य मंदिरा समोर एक सभामंडप बांधण्यात आलेले आहे. तेथे खाण्यापिण्याची सोय करण्यात आलेली आहे. तसेच मंदिराच्या आजू-बाजूला छोटी-मोठी दुकाने आहे.