श्री तुळजाभवानी मंदिर

information of Shree Tulja Bhavani Temple.
नमस्कार, तुळजापूर मधील तुळजाभवानी मंदिराची माहिती पाहणार आहोत.
नाव :- तुळजा भवानी मंदिर.
जिर्णोउद्धारक :- छत्रपती शिवाजी महाराज.
देवता :- तुळजा भवानी.
वास्तुकला :- हेमाडपंथी
स्थान :- तुळजापूर, धाराशिव, महाराष्ट्र.
तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणूनओळखली जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाविकांसाठी हे मंदिर अत्यंतमहत्त्वाचे तीर्थस्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भवानी म्हणूनप्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आराध्य देवता अशीही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. तसेच या मंदिराला दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात भेट देतात.
इतिहास
आता आपण इतिहास पाहूया, हे शहर बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराचा काही भाग हेमाडपंथी आहे. इतिहास वपरतत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तुळजाभवानी संबंधित सर्वात जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील‘काटी‘ येथे इसवी सन १३९७ सालच्या शिलालेखात पहावयास मिळतो. मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहिताचे अधिकार पाळीकर भोपे कुळाकडे आहेत.देवीच्या दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग पासची सेवा उपलब्ध आहे. ऑनलाइन पास सेवेमुळे थोड्या प्रमाणात वेळेची बचत होते वथोडेफार पैसे मंदिर प्रशासनाला द्यावे लागतात.
श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठे प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खालीगेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात, तसेच हातपाय ही धुतात.
दसरा उत्सव
आता आपण दसरा उत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो ते पाहूया.
श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर परिसरा मधील पिंपळाच्या पारावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते. या दसऱ्याच्या दिवशी लाखो भाविक मंदिर परिसरामध्ये येतात.
श्री तुळजाभवानी देवीची रोज केली जाणारी पूजेचा कार्यक्रम पाहूया.
१. ओटी भरण
सर्वात अगोदर ओटी भरण पाहूया.
सहज दर्शनाच्या वेळी किंवा इच्छा झाल्यास भक्त देवीची पाद्यपूजा करून ओटी भरण भरतात. ही पूजा मंदिर उघडल्यापासून बंद होईपर्यंत कोणत्याही वेळेत करता येते.
आणि आता अभिषेक पूजा पाहूया.
२. अभिषेक पूजा
श्री तुळजाभवानी देवीला सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत अभिषेक पूजा घालण्यात येतात. सध्या अभिषेक पूजेची सुरुवातीस छत्रपती संस्थान कोल्हापूर यांच्याकडून आलेल्या दुधाची कळशी श्री देवीच्या मूर्तीवर ओतली जाते. बाकी इतर सर्व अभिषेक पूजा व सिंहासन पूजा या देवीच्या मूर्ती समोर चांदीच्या पादुका ठेवून केली जातात.
आणि आता सिंहासन महापूजा पाहूया.
३. सिंहासन महापूजा
सिंहासन महापूजा ही दही, दूध, श्रीखंड, आंब्याचा रस, उसाचा रस यापैकी ज्याचे त्याचे इच्छेप्रमाणे एका प्रकारात केली जाते. सिंहासन पूजेसाठी ७० लिटर साहित्याचा वापर केला जातो. सिंहासन पूजा ही बुकिंग पद्धतीने करण्यात येत असून, दररोज सकाळी पूजेच्या वेळी ५ व सायंकाळी पूजेच्या वेळी २ सिंहासन पूजा करण्यात येतात.
श्री तुळजाभवानी देवीची माहिती :-
श्री क्षेत्र तुळजापूर हे एक शक्तिपीठ आहे. देवी भागवताच्या कर्त्याने या शक्तिपीठाचा समावेश एक्कावन शक्तीपीठात केलेला असून, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातले ते आद्य पीठ आहे. ते ज्या डोंगर भागात वसलेले आहे, त्या बालाघाटातील डोंगराचे नाव “यमुनाचल” असे आहे. तुळजापुराची अधिष्ठात्री देवी तुळजाभवानी ही महिषमर्दिनी दुर्गेच्या रूपात आहे. पण तिने आद्य दर्शनाचा मान प्रवेशद्वारातल्या मातंगीला दिलेला आहे. मातंगी, यमाई, यल्लम्मा, रेणुका ही एकाच प्राचीन मातृदेवतेची नावे आहेत. हे अनेकाने प्रमाणांनी प्रकाशित झालेले सत्य दृष्टीपुढे ठेवून विचार करताना यमाई ते माहिषमर्दिनी हा तुळजाभवानीचा प्रवास अद्भुत आहे. तुळजापुरात आद्य शंकराचार्यापासून अनेक संत व महान संत यांचे योगदान आहे. अनेक राजे राजवाड्यांच्या आणि वीरा ग्रणींच्या शौर्य इथल्या भूमीच्या कणाकणात भरलेली आहे. शाक्त, कापालिक, नाथ आणि दासनामी संन्यासी-गोसावी या साधना-संप्रदायाच्या प्रभाव खुणा इतिहासाच्या पानात आणि तुळजापुरात आज अस्तित्वात असलेल्या मंदिरात क्षीण अवस्थेत जाग्या आहेत. त्यामुळे तुळजापूरच महत्व महान आहे.
तुळजापूर हे क्षेत्र आंध्र कर्नाटकाच्या सीमेलगत असल्यामुळे आणि पूर्वकाली या सीमा एकत्र असल्यामुळे दक्षिणेशी या क्षेत्राचा संबंध अत्यंत जिव्हाळ्याचा अत्यंत आत्मीयतेचा होता. कर्नाटकातील विशेष दक्षिण कन्नड प्रदेशातील सेन, कर्नाट आणि संभवत: कदंब ही राजकुळे तुळजाभवानीच्या उपासनीशी संबंध होती. सेन आणि कर्नाट या दोन राजकुळांनी तिचा महिमा सुदूर बंगाल, मिथिला, हिमाचल आणि नेपाळ इथपर्यंत पोहोचविला गाजविला हे ऐतिहासिक सत्य आहे.
तुळजा भवानी मंदिर आणि छत्रपती घराणे :-
तुळजापूर हे भवानीचे क्षेत्र धाराशिव जिल्ह्यात असून, तुळजापूर नावाच्या तालुक्याचे मुख्य केंद्र आहे. सोलापूर पासून तुळजापूरचे अंतर सुमारे ४५ किलोमीटर आहे. तुळजाभवानीचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. गर्भग्रह, गूढमंडप आणि सोळखांबी मंडप तसेच सभामंडप अशी विस्तीर्ण प्रकारातील भवानी मंदिराची रचना आहे. हे क्षेत्रपूर्वी हैदराबाद राज्यात असल्यामुळे निजामाचे सरदार करमाळ्याचे निंबाळकर यांनी आपल्या या कुलस्वामिनीच्या मंदिराच्या बांधणीत मोठे योगदान केले. भवानी मंदिराच्या उत्तुंग प्रवेशद्वारात एक निंबाळकर दरवाजा ठिकाणाला “संस्थानवाडा” म्हणतात. भगवतीच्या विहिरीजवळ संस्थानवाडा आहे. संस्थांनच्या व्यवस्थापकास “कामगार” नावाने संबोधले जाते. तुळजापूरचे प्रयाग घराणे छत्रपतींचे उपाध्याय घराणे आहे.
कोल्हापूर संस्थाने तुळजापूर येथे स्थापन केलेल्या धार्मिक यंत्रणेत दररोज १२ माणसे कार्यरत आहेत त्यांचा मासिक पगार एकूण ३०३ रुपये आहे. करवीर छत्रपतींच्या वतीने रोज पहाटे साडेपाच वाजता, दुपारी बारा वाजता, सायंकाळी साडेसहा वाजता आणि रात्री बारा वाजता असा एकूण चार वेळा चौघडा वाचतो. पहाटे चौघडा सुरू होण्यापूर्वी, पाच वाजता देवीचे मुख आणि चरणकमळ धुण्याचा कार्यक्रम असतो. तेव्हा देवीच्या मुखाला व चरणांना लावले जाणारे अत्तर आणि सुगंधी तेल करवीर संस्थानचे असते. देवीला दाखवला जाणारा पायसाचा नैवेद्य आणि त्यानंतरचा विशेष विडा देण्याचा मान ही करवीर संस्थानाचाच असतो. देवीची दुसरी पूजा पंचामृतस्नानाची असते ती ही करवीर संस्थांच्या तर्फेस केली जाते. पूजेनंतर देवीला हळदीकुंकू वाहून तिची आरती करतात. या आरतीचे साहित्य उद,कापूर वगैरे संस्थांच्या कार्यालयातून मिळते. महानैवेद्यात पोळ्या, वरण-भात, भाजी आणि तूप साखर यांचा समावेश असतो. सायंकाळच्या पूजेच्या वेळी बत्ताशांचा नैवेद्य असतो. रात्री साडेनऊच्या सुमारास शेजारती झाल्यावर संस्थान करून साखर युक्त तूप भाताचा नित्याच्या पाच नैवेद्यातील पाचवा नैवेद्य अर्पण केला जातो.
नवरात्र महोत्सवात दररोज कोल्हापूर संस्थांची भोगी पंचामृतस्नान घालून देवीची ओटी भरतात. संस्थानवाड्यातून ती वाजत-गाजत दरबारी थाटात देवीला अर्पण करण्यास नेतात. तसेच अष्टमीच्या दिवशी होणाऱ्या होमाच्या प्रसंगी ही प्रयागत छत्रपतींच्या वतीने यजमानपद स्वीकारतात. या दिवशी सकाळी घरातील सुहासिनी व कुमारीका मंदिरात एकत्र येऊन देवीला हळद-कुंकू अर्पण करून तिची ओटी भरतात. सायंकाळच्या पूजेच्या वेळी देवीला फुलांचा मुकुट आणि पुष्पहार अर्पण केला जातो. तोही संस्थानच्याकडूनच या पुष्प सेवेसाठी घाटशिळेच्या पायथ्याशी फुलांची बाग आहे. ती राजाची बाग या नावाने ओळखले जाते. करवीर छत्रपती आणि भवानी यांचे हे अतूट नाते नित्य नैतिक असे अखंड राखले गेले आहे.
छत्रपतींनी निर्मित केलेली भवानीस्थाने :-
भोसले राजकुलाच्या कुलस्वामिनी चे मूळ पीठ तुळजापूर हे आहे. परंतु त्या क्षेत्रावर शत्रू पक्षाची अधीसत्ता असल्यामुळे शिवाजी राजांनी प्रतापगडावर तिचे नवे ठाणे निर्माण केले. आणि त्या ठाण्याला जागृत क्षेत्राची प्रतिष्ठा आपल्या असाधारण उत्कट अशा भक्ती भावनेतून प्राप्त करून दिली. प्रतापगडावरील या नव्या ठाण्याप्रमाणेच वाराणसी येथेही शिवप्रभूंनी आपल्या कुलदैवतांचे एक ठाणे निर्माण केले होते. आग्र्याच्या बंदीवासातून परतताना फकीरवेशात मार्गक्रमण करताना शिवाजीराजे वाराणसी अत्यल्प काळ थांबले असावेत.