
श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
नमस्कार,
श्री महालक्ष्मी अंबाबाई देवी तसेच मंदिराची माहिती पाहणार आहोत.
महालक्ष्मी हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पिठांपैकी एक आहे . मंदिराच्या बाहेर श्री काळभैरव आहे. तसेच काशी विश्वेश्वर चे मंदिर सहित बारा ज्योतिर्लिंग ही आहे. त्यामुळे हे मूळ आदिमाया त्रिगुणात्मक स्वरूपींनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात.
पुराणातील माहिती :-
हे मंदिर इसवी सन ६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे . मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले. अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरुन अंबाबाई मंदिराची माहिती सिद्ध होते. आणि कोल्हापूरची अंबाबाई देवी खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी होते.
कधीकाळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्ष लपून ठेवली होती. असे म्हणतात पुढे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इसवी सन १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनर्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम सुंदर दगडाच्या भिंती व विविध वास्तूंमुळे मंदिराची रचना प्राचीन दिसते . मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्ती मागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे. आणि त्यावर नागमुद्रा आहे. अकराव्या शतकातील शिलालेखात याचा उल्लेख आढळतो.