निमगाव-दावडी खंडोबा मंदिर

 

 

निमगाव-दावडी खंडोबा मंदिर

Nimgaon-Dawadi Khandoba Temple 

निमगाव खंडोबा हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ गाव आहे.
निमगाव खंडोबा हे गाव पुणे-नाशिक महामार्गावरील खेड तालुक्यातील मुख्य ठिकाण म्हणजे राजगुरुनगर पासून ६ किलोमीटर अंतरावर आहे. निमगावच्या उत्तरेस १.५ किलोमीटर अंतरावरील टेकडीवर खंडोबा देवाचे मंदिर आहे. येथे थेट वाहनाद्वारे मंदिराजवळ पोहोचता येते. आणि येथे आल्यावर वाहन लावण्यासाठी वेवस्था करण्यात आलेली आहे.
तुम्हाला माहित आहे का?
निमगाव हे खंडोबा मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे गाव आहे.  निमगाव हे  नाव अनेक गावांचे असल्यामुळे ओळख पटवण्यासाठी या नावाला जोड देण्याची प्रथा आहे. पूर्वी या निमगाव जवळ नागना नावाचे गाव होते. त्यामुळे या निमगावचा उल्लेख निमगाव नागना असा केला जात असे. परंतु काळाच्या  ओघात नागना गाव नष्ट  झाले आणि निमगाव जवळील दावडी  या दुसऱ्या गावावरून निमगाव-दावडी हे गाव या नावाने प्रसिद्ध झाले. आता हे गाव निमगाव-खंडोबा या नावाने प्रसिद्ध होत आहे.
मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत सिमेंट काँक्रेटचा रस्ता बनवण्यात आलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूने मंदिराकडे जाण्यासाठी पायरी मार्ग सुद्धा आहे. सिमेंटच्या रस्त्याने जात असताना एक दगडी कमान लागते.
मंदिराच्या चारी बाजूला बुरुज आहे. आणि या बुरुजांची उंची २५ फूट आहे. मंदिराच्या दर्शन मार्गाकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला  प्रसादाची तसेच खंडोबा देवाच्या मूर्तींची इ. दुकाने आहे.
मुख्य मंदिरासमोर एक लहान मंदिर आहे, त्यामध्ये नंदी आहे. आणि बाजूलाच दीपमाळा आहे. तसेच एका बाजूला दर्शन मार्ग सुद्धा आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस मधोमध श्री गणरायाची मूर्ती दिसते. आणि बाहेरील बाजूस एका बाजूला श्री गणपती  तसेच दुसऱ्या बाजूला श्री हनुमानाची मूर्ती दिसते.