पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक प्रसिद्ध लेण्यांची माहिती पाहणार आहोत. ती लेणी म्हणजे जुन्नर लेणी. जुन्नर शहर हे महाराष्ट्रातील एक इतिहास प्रसिद्ध नगर आहे. हे पुणे जिल्ह्यात शिवनेरी गडाच्या पायथ्याशी वसलेले असून सह्याद्रीचा नाणेघाट तिथूनच जवळ आहे. या नगराचे नाव पूर्वी जीर्णनगर, जुन्ननगर,आणि आता जुन्नर असे बनले असावे.
जुन्नर शहर हे भारतातील एक प्राचीन शहर म्हणून ओळखले जाते. पूर्वीच्या काळी जुन्नर शहरातील नाणेघाटातून मोठ्या प्रमाणात व्यापार केला जात असे आणि आजही तो नाणेघाट तिथे पाहायला मिळतो. नाणेघाट पाहताना असा अनुभव येतो की या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात व्यापारी ये जा करीत असे त्या ठिकाणी नाणेघाटाच्या शेजारी प्राचीन लेण्या आढळून येतात. तसेच एक तेथे दगडाचं कुंड दिसून येते.
जुन्नर शहर व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळे त्या ठिकाणी प्राचीन अशा लेण्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि तसेच महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेण्या हे जुन्नर शहराच्या आजूबाजूला आहे यावरूनच जुन्नर शहराचे एक प्राचीन महत्त्व समजून येते.
जुन्नरच्या परिसरात एकूण दीडशे लेणी असून ती भीमाशंकर, अंबिका, भूतलिंग, शिवनेर, तुळजा, गणेश व सुलेमान अशा सात गटात विभागलेली आहेत. असे मानले जाते की, शिल्प शास्त्राने मान्य केलेल्या प्रमाणावरून दिसून येते की जेव्हा पासून सह्याद्रीत लेणी खोदणे सुरू झाले तेव्हापासून ती प्रथा लुप्त होईपर्यंत ह्या लेण्यांमध्ये शिल्पकाम चालू होते. तसे पाहिले तर ह्या लेण्या मुख्य रस्ता पासून थोड्या दूर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एका डोंगराच्या मध्यभागी असून चारी बाजूने मोठ्या प्रमाणात जंगल आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच या लेण्या पाहायला जाणार असाल तर तुम्ही ह्या लेण्यांपर्यंत पोहोचताना खूप वेळा रस्ता चुकू शकता. पण ह्या लेण्यांकडे जाताना छोट्या पाऊलवाटा जातात. त्याच रस्त्याने जर व्यवस्थित गेला तर तुम्ही लवकरात लवकर या लेण्यांपर्यंत पोहोचू शकता.
भीमाशंकर व अंबिका हे गट ज्या टेकडीत आहेत तिचे नाव मानमोड आहे. मूळ नाव मानमुकुट असे होते. अंबिका गटाला हे नाव त्यातील अंबिकेच्या मूर्तीवरून प्राप्त झालेले आहे. असे मानले जाते. ही जैनांची देवी आहे. जुन्नर गटातली लेणी मूळ बौद्धांच्या हिनयान पंथांचीहोती. कालांतराने त्यावर महायान जैन व ब्राह्मणी म्हणजे वैदिक संस्कार झाले. या लेण्यात अनेक सुंदर चैत्यगृह आहेत. इथले सातकर्णी स्तंभ व बौद्ध स्तूप प्रेक्षणीय आहेत. येथे सर्व प्रकारचे स्तूप आढळतात. काही लेण्यांत रंगीत रेखाकृती काढलेल्या होत्या त्यापैकी काही अजून चांगल्या स्पष्ट दिसतात.
यावरून असं समजले जाते की ह्या लेण्यांचंखूप वर्षापासून खोदकाम चालू होते आणि पिढ्यानपिढ्या ह्या लेण्या कोरल्या गेल्या असाव्या असं मानले जात. जुन्नर च्या लेण्यात एकूण पस्तीस लेख आहे. बहुतेक लेख किरकोळदानांचे आहेत.ऐतिहासिक महत्त्वाचा असा लेख एकच असून तो भीमाशंकर गटातील क्रमांक सहा या लेण्यात आहे.
मावळ भागात उदयासआलेल्या सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी याने संघटित रित्या शक-क्षत्रपांनानाशिकच्या परिसरात पराभव करून महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केल. सातवाहन विजयी झाल्यानंतर च्या काळात जुन्नर परिसरातील सर्व बौद्ध लेण्यांवर ब्राह्मणी संस्कार झाले लेण्याद्रीतील गणेशाची आणि शिवनेरीवरील शिवाय देवीची स्थापना ही अशीच नंतरच्या काळातील घटना आहे.