वेण्णा तलाव

वेण्णा तलाव, महाबळेश्वर

महाबळेश्वर मधील वेण्णा तलावाची माहिती

information in Marathi about venna lake.

 

महाराष्ट्रातील वेण्णा तलाव ह्या लोकप्रिय पर्यटन स्थळाची माहिती पाहणार आहोत.
वेण्णा तलाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिध्द ठिकाण आहे. १८४२ मध्ये साताऱ्याचे राजा श्री आप्पासाहेब महाराज यांनी तलाव बांधला होता.
तसे पाहिले तर या तलावाची लांबी ४ km आणि रुंदी १.५० किलोमीटर आहे. तसेच सरासरी उंची ही ८० फूट म्हणजे २४ मीटर आहे. आणि मध्यभागी उंची १२० फूट म्हणजेच ३७ मीटर आहे.
वेण्णा तलाव हा आजूबाजूच्या झाडांनी वेढलेला आहे. पर्यटक तलावावर बोट रायडींग किंवा तलावाशेजारी घोडेस्वारीचा आनंद घेण्यासाठी येतात. तलावाच्या काठावर अनेक लहान मोठे भोजनाले आहे. तसेच महाबळेश्वर शहराची बाजारपेठ आणि एसटी बस स्थानक तलावापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर आहे.
वेण्णा तलावा शेजारीच वाहने लावण्यासाठी मोठी सोय करण्यात आलेली आहे. तलावातील काही बोटी खूप मोठ्या आहे. त्यामध्ये त्या बोटी चालवण्यासाठी त्यांचा चालक असतो. आणि काही बोटी अशा आहेत की ते एक किंवा दोघेजण स्वतः चालू शकता.