New palace (shahu palace) Kolhapur

 

New Palace | Kolhapur

New Palace Museum of Kolhapur.

History of New Palace in Marathi.

कोल्हापूर मधील न्यू पॅलेस चा इतिहास.

 

न्यू पॅलेस म्हणजे छत्रपती शाहू पॅलेस कसबा बावडा मार्गावर ही एक प्राचीन इमारत आहे. ही इमारत कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे. १८७७ ते १८८४ या कालावधीत ही इमारत बांधली गेली. काळ्या सपाट केलेल्या दगडांचा एक उत्कृष्ट नमुना बांधला आहे. जे सर्व प्रवाशांचेच मन वेधून घेते.  इमारतीचे बांधकाम हे संपूर्ण मजबूत दगडामध्ये करण्यात आलेले आहे. त्याला लागूनच एक बाग आहे. त्याला दगडांच्या भिंतीचे व तारांचे कुंपण आहे. संपूर्ण इमारत आठ कोणी आहे. आणि त्याच्यामध्ये बुरुज आहे. तसेच १८७७ मध्ये येथे घड्याळ बसवले गेले आहे. थोड्या अंतरावर येथे बुरुज आहेत. प्रत्येक काचेवर शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी लिहिले आहे. येथे प्राणी संग्रहालय आहे. आजचे श्रीमंत शाहू महाराजांचे निवासस्थान आहे.
न्यू पॅलेस मधील आतील बाजूस छत्रपती शाहू महाराजांच्या वस्तुसंग्रहालयासाठी जागा केली आहे. यामध्ये कोल्हापूर मधील राज्यकर्त्यांची सर्व माहिती दाखवली आहे. न्यू पॅलेसच्या कुंपणाच्या बाहेरील बाजूस वाहने लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. न्यू पॅलेस हे महाराष्ट्रातील पर्यटनापैकी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. आणि वर्षभरामध्ये येथे लाखो पर्यटन भेट देतात. तसेच राज्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीमार्फत न्यू पॅलेस दाखवण्यात येते.

न्यू पॅलेसच्या आत मध्ये गेल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या शिकार, तसेच त्यांचे अवशेष तेथे ठेवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शाहू महाराजांचे कपडे त्याच बरोबर विविध वापरातील वस्तू, बसण्याच्या खुडच्या इतर वस्तू ठेवण्यात आलेल्या आहे. न्यू पॅलेस ला शाहू पॅलेस ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते. इमारतीच्या समोरच्या बाजूला म्हणजेच बागेच्या बाजूला मोठी घड्याळे बसवण्यात आलेली आहे. आणि ते आता सुद्धा चालू आहे. तसेच ज्या ठिकाणी घड्याळ बसवण्यात आलेले आहे तो भाग उंच बांधला आहे. कारण लांबून सुद्धा घड्याळामध्ये किती वाजले आहे. ते समजून येण्यासाठी तो भाग उंच बांधण्यात आलेला आहे. पॅलेसच्या बाजूलाच पर्यटकांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आलेल्या आहे. आणि ह्या स्वच्छतागृहाकडे जाताना आजू-बाजूला सुंदर झाडे लावण्यात आलेली आहे.
इमारतीच्या समोरच छोटा प्रति पन्हाळगड बनविण्यात आलेला आहे. ही इमारत युरोपियन आणि भारतीय वास्तुशास्राचे मिश्रण असलेली ही एक वास्तु शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. ज्या ठिकाणी प्राणीसंग्रहालय आहे त्या ठिकाणीच एक तळे बांधण्यात आलेले आहे. तसेच राखीव जंगल सुद्धा आहे. जंगलामध्ये हरिण, सांबर, मोर यांसह इतर प्राणी आहेत. न्यू पॅलेस मध्ये आजही राज घराण्यातील परिवारांचे वास्तव्य आहे. ही इमारत ३० जून १९७४ रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या जन्मशताब्दी दिनी या राजवाडातील तळमजला हा करवीर संस्थांनचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज या नावाने शहाजी छत्रपती म्युझिअम म्हणून पर्यटकांसाठी सुरू करण्यात अले.

इमारतीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी भारतात केलेले शिकारी तसेच परदेशात केलेल्या शिकाऱ्यांची नोंद ठेवण्यात आलेली आहे. उदा. रान कोंबडा, रान डुक्कर, हात्ती, सांभर, बिबट्या, गेंडा, अस्वल इत्यादी. आणि त्यातील काही शिकाऱ्यांचे अवशेष आज सुद्धा तेथे दाखवण्यात आलेले आहे. आणि तसेच विविध तलवारी, भाले विविध तोफा, बंदुका, खंजर, चाकू इत्यादींच प्रदर्शन सुद्धा ठेवण्यात आलेले आहे. महाराजांनी विदेशातील घेतलेल्या पदव्यांचे प्रमाणपत्र सुद्धा तेथे दाखवण्यात आलेले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कुस्त्यांना एक महत्त्वाचे स्थान दिले होते. त्यामुळे कोल्हापूरमध्ये विविध तालीम बांधण्यात आलेली होती. आणि न्यू पॅलेस मध्ये छत्रपती घराण्यांची  वंशावळाची माहिती देण्यात आलेली आहे.
न्यू पॅलेस हा छत्रपती शाहू महाराजांची शौर्याची गाथा सांगतो तसेच छत्रपती शाहू महाराज हे एक महान राजा तसेच समाज सुधारक होते. शाहू महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे महान कार्य केले. आणि छत्रपती शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात शिक्षणांचा प्रसार, वस्तीगृह, गरीब तसेच समाजातून दूर केलेल्या माणसांना त्यांचा अधिकार मिळवून दिला. आज सुद्धा महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेमध्ये शाहू महाराजांविषयी एक आदर, प्रेम आणि एक जिव्हाळ्याचे नातं दसून येतं.