
फि फि आईलँड (Thailand)
फि फि आईलँड.
फि फि आईलँडची माहिती.
फि फि आईलँडचा इतिहास.
फुकेत (Phuket) फि फि आईलँड.
Phi Phi Island.
Phi Phi Island information.
History of Phi Phi Island.
Phi phi island, Thailand
नमस्कार, तुम्हाला जर एका अद्भुत रोमांचक प्रवासाची सुरुवात करायची असेल तर, एक असं पर्यटन स्थळ आहे. जे तुम्ही पाहून आयुष्यभर तो प्रवास विसरू शकत नाही. आणि तो रोमांचक प्रवास म्हणजे फि फि बेटांचा प्रवास. त्यासाठी तुम्हाला थाइलँड या देशामध्ये जावे लागेल. आणि तो रोमांचक प्रवास असणार आहे. म्हणजेच अनेक बेटांवरती आणि ती बेटे थाईलँडच्या समुद्रामध्ये आहे.

सर्वात अगोदर मुंबईमधून श्री छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरून तुम्हाला विमाणाने थाइलॅंड मधील फुकेटमध्ये या शहरामद्ये जावे लागेल. तुम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहात. तेथून तुम्हाला गाडीने फुकेटच्या समुद्रकिनाऱ्यावर नेले जाईल आणि तेथून स्पीड बोटणे फि फि बेटांकडे नेण्यात येईल. आणि तेथूनच तुमच्या एक रोमांचकारी प्रवासाला सुरुवात होईल.

फि फि बेटे हे थाईलँड मधील क्राबी प्रांतातील अत्यंत सुंदर आणि लोकप्रिय बेटांचा समूह आहे. अंदमान समुद्रात वसलेली ही बेटे त्यांच्या उंच डोंगर आणि चुनखडीच्या कडा, पांढऱ्या वाळूचे किनारे, स्नॉर्कलिंग आणि डायव्हिंगसाठी ओळखली जातात.

फि फि आईलँड बद्दल माहिती.
- स्थान: हे बेट थायलंडच्या क्राबी प्रांतामध्ये आहे आणि फुकेतपासून साधारणपणे ४६ किमी आग्नेयेस आहे.
- मुख्य बेटे: ‘फि फि डॉन’ (Phi Phi Don – जेथे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत) आणि ‘फि फि लेह’ (Phi Phi Leh – जेथे माया बे आहे) ही प्रमुख बेटे आहेत.
- पर्यटन: येथे पर्यटक फिरण्यासाठी बोट टूर (Speed boat tours) घेतात, ज्यात बांबू आयलंड, व्हायकिंग केव्ह्ज, पिलेह लॅगून आणि माया बे या ठिकाणांचा समावेश असतो.
- फि फि नावाचा इतिहास: ‘फि फि’ हे नाव ‘पुलौ आपी-आपी’ (Pulau Api-Api) या मलय शब्दावरून आले आहे. ज्याचा अर्थ ‘कांदळवनाचे बेट’ असा आहे.
- जाण्यासाठी मार्ग: मुंबईहून श्री छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरून (BOM) फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर (HKT) उतरून, तेथून फेरी (Ferry) किंवा स्पीड बोटने फि फि आईलँड ला पोहोचता येते.
फि फि बेटांचे Photos
Photos of phi phi island of Thailand












