महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर. चिंचवड, पुणे.

श्री मोरया गोसावी गणपती मंदिर, पिंपरी-चिंचवड.
महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर. चिंचवड, पुणे.
श्री मोरया गोसावी महाराज मंदिराचा इतिहास मराठीत.
Mahasadhu Shree Gosavi Moraya Maharaj Sanjivan Samadhi Mandir. Pimpri-Chinchwad, Pune.
history of Moraya Gosavi Maharaj temple in marathi.
मोरया गोसावी मंदिर, चिंचवड, पुणे
श्री मोरया गोसावी महाराज हे १४ व्या शतकातील एक महान गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला होता. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली व अष्टविनायक यात्रेची सुरुवात सुद्धा त्यांनीच केली.

पुत्र प्राप्तीचा मार्ग:
त्यांना त्यांच्या जीवनाथ खूप संघर्ष करावा लागला. जीवनातील सर्वात मोठा संघर्ष म्हणजे, त्यांना पुत्र संतान नव्हते. पुत्रप्राप्तीच्या मार्गात काही अडथळा असल्यास तो दूर करण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रा करण्याचे ठरवले. जेणे करून काहीतरी मार्ग निघेल. त्यांची पत्नी त्यांच्या बरोबर तीर्थयात्रा करत- करत ते इ.स.१३२४ मध्ये मोरगावला आले. श्री वामनभट्ट यांनी ठरवले की पुत्र प्राप्ती साठी संकल्प करून अनुष्ठान करायचे, व त्याच बरोबर तपश्चर्या करून श्रीमयूरेश्वराला प्रसन्न करून घ्यायचे. असा संकल्प करून त्यांनी अनुष्ठानास प्रारंभ केला. अश्याप्रकारे त्यांनी ४ तप {४८ वर्ष} अनुष्ठान केले होती. एकेदिवशी पहाटे साक्षात तेजोनिधी मयूरेश्वर त्यांच्या समोर प्रकट झाले व म्हणाले “वामना तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या नशिबी जरी पुत्र नसला, तरी मी पुत्र रूपाने तुझ्या पोटी अवतार घेईन व जगाचा उद्धार करेन. असे सांगण्यात आले. वामनभटांची तपश्चर्या फळाला आली. आणि त्याचं स्वप्न पूर्ण झाले.

जन्म आणि बालपण:
आणि थोड्याच दिवसात पार्वतीबाई गर्भवती झाल्या व नवमासपूर्ण होताच श्री शालिवाहन शके १२९७ सन.१३७५ साली पार्वतीबाई प्रसूत झाल्या. मयूरेश्वर रूपाने मुलाची प्राप्ती झाली. मुलाचे नाव ‘मोरेश्वर’ असे ठेवले सर्वजण प्रेमाने त्यांना असे ‘मोरया’ म्हणत.
वयाच्या ८ व्या वर्षी मोरयांची मुंज झाली. मोरया रोज त्रिकाल संध्या, गायत्री जप, सूर्योपासना, अग्निउपासना आणि अनुष्ठान करण्यात करू लागले. त्यांनी अष्टविनायक यात्रा करण्याचे ठरविले.

मोरगाव ते चिंचवड गावाकडे प्रवास:
मोरया गोसावींचा सगळीकडे प्रसिद्धी वाढू लागली. आणि याच कारणाने ध्यानधारणेला वेळ मिळेना. एक दिवस अचानक मोरगाव सोडून मोरया गोसावी चिंचवड जवळच्या किवजाईच्या जंगलात आले. त्याचवेळी श्री मयूरेश्वराने दृष्टांत दिला की, “तू आता पवना नदीच्या तिरावर असलेल्या चिंचवड गावी जाऊन रहा आणि दर महिन्याच्या विनायकी चतुर्थीस मोरगाव वारीस येत जा”. नंतर त्यांनी ताथवडे येथील केजूबाई मंदिर येते वास्तव्य केले. एकांतात ध्यानधारणा करू लागले. पण नियती काही वेगळीच होती. चिंचवडकरांनी त्यांना गावात आणले. आजचा वाडा आहे त्या ठिकाणी त्यांना झोपडी बांधून दिली. त्यात राहून मोरया गोसावींची सेवा करू लागले. प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडत ते मोरगावला जात.
श्री मोरयांना मंगलमूर्ती ची प्राप्ती:

एकदा श्रीमोरया नेहमीप्रमाने वारीस गेले. देवळात मयुरेश्वराचे ध्यान करत असता, साक्षात श्रीमयुरेश्वर प्रकट झाले. श्रीमोरयांनी त्यांना साष्टांग दंडवत घातले. त्यांना उठवून मयुरेश्वराने सांगितले की. आता तू वृध्द झाला आहेस. वारीस येताना तुझे हाल होतात. ते हाल मला पाहवत नाहीत. तुझी वारी मला पावली. तू आता वारीस येऊ नकोस. मीच तुझ्या बरोबर चिंचवड ला येतो. आणि दुसऱ्या दिवशी श्रीमोस्यांना स्नाना नंतर अर्घ्य देत असताना, शेंदरी रंगाचा तांदळा हातात आला. त्यावेळी आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली व मयुरेश्वराच्या नामाचा गजर केला.
श्री मयूरेश्वराचा हार:

श्री मयूरेश्वराचा हार श्री मोरयांच्या गळ्यात पडला. श्री मोरयांना मंगलमूर्ती प्राप्ती झाल्या नंतर मंगलमूर्तिना श्रीमयुरेश्वराच्या मंदिरात आणले. त्यावेळी दर्शनासाठी अनेक लोक जमले होते. त्या सर्वांच्या देखतच श्रीमयुरेश्वराच्या गळ्यातील हार श्री मोरयांच्या गळ्यात पडला. हा चमत्कार सर्वांनी पाहिला आणि आनंदाने गहिवरून गेले.
भक्तांसाठी श्री मयुरेश्वर चिंचवडला आले:

भजन करीत श्री मोरया गोसावी मंगलमूर्ती घेऊन चिंचवड ला येत होते. ते चिंचवड ला आले तेव्हा चिंचवडच्या वेशीवर गावकरीही त्यांना सामोरे आले आणि वाजत गाजत मंगलमूर्तीना गावात आणले. प्राणप्रतिष्ठेचा समारंभ अत्यंत थाटात केला गेला आणि मंगलमूर्ती देऊळवाड्यात (मंगलमूर्ती वाडा) स्थापन झाले
बाळ चिंतामणी ला गणपतीने स्वतः प्रसाद खाऊ घातला:

श्री मोरयांची गणपतीची उपासना फार कडक होती. त्यांनी कधीच चंद्रोदया आधी अन्नग्रहण केले नाही. एकदा संकष्टी च्या दिवशी बाळ चिंतामणी ला खूप भूक लागली, पण श्री मोरयांनी त्यास स्पष्ट नकार दिला आणि चिंतामणी ला भजन करण्यास सांगितले. आज्ञेप्रमाणे चिंतामणी “मोरया हो बाप्पा मोरया हो” असे भजन करत बसले आणि आर्त धाव ऐकून चतुर्भुज स्वरूपात श्री मयुरेश्वर प्रसाद घेऊन प्रकट झाले. आणि चिंतामणी ला स्वतः हाताने प्रसाद भरविला.
श्री देव संस्थान यांना मिळालेली इनाम गावे व त्यांचे वैभव:

श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज, श्री चिंतामणी महाराज, श्री नारायण महाराज व त्यांच्या पुढील सर्व वंशजांवर श्री शहाजी महाराज भोसले, श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज, श्री बाजीराव पेशवे श्री नाना- साहेब पेशवे व अनेक मुगल बादशहा यांची अपार श्रध्दा होती त्यामुळे श्री देव संस्थानास चिंचवड, भोसरी, चिखली, बाणेर, रावेत, पिरंगुट, जांबे, माण, थेऊर, मोसे, उसे, पौड, सुपे, कुंभारवळण, लोणीभापकर, पाणदरे, कोथळे, अबि, काहाड, शेलगाव, पिंपळे गुरव, नेरे, इंदापूर, मूडखेल, मावडी, मोरगाव, नायगाव, राजुरी, दौंड, बारामती, बोपगाव, सासवड, शिरवळ, खेड, हिंजवडी, बाकड, पिंपरी, पिंपळे- सौदागर, आकुर्डी, चिंचोली, चाकण, ताथवडे, भिवरी, नाणे, यवत, सिध्दटेक, ओद्वार पाली अंबरनाथ, कसबे, भिवंडी, चौल, खारेपाटण, बोराटी, मुरवाड, चोण्, कान्हेर, सांगवे इत्यादी बारा मावळे या स्वराज्याच्या प्रारंभी व स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर अशी गावं इनाम म्हणून मिळाली.
श्री मोरया गोसावींना केलेल्यासर्पदंशातून सर्पाची मुक्ती:

श्री महासाधू मोरया गोसावी एकदा मोरगांव कडून थेऊरकडे येताना वाटेत एक डोंगर लागला. तेथे एक महाभयंकर सर्प होता. तो येणाऱ्या जाणाऱ्या पायस्थांना दंश करून प्राण घेत असे. श्री मोरया गोसावी गणेशभक्तीत तल्लिन होऊन तेथून जात होते. ब्रम्हानंदी लागली टाळी, कोण त्या देहाते सांभाळी:
ही त्यांची अवस्था होती. या महासाधूंना पाहताच तो महाविषारी सर्प धावत फुत्कारत तेथे आला. त्याने महासाधूंच्या अंगावर झेप घेतली व त्यांच्या पायाचा कडाडून चावा घेतला. गणेशभक्तीत तल्लिन असलेल्या महासाधूंना देहभान नव्हते. त्यांना कोणती विषबाधा होणार? सर्पास महासाधूंच्या स्पर्शाने पूर्वजन्माचे ज्ञान झाले. त्याने त्याचा पापी देह श्री मोरया गोसावींच्या चरणी सोडला आणि त्यांच्याच कृपेने तो मुक्त झाला.
वाघाची शिळा झाली:

महासाधू श्री मोरया गोसावी महाराज हे श्री क्षेत्र थेऊर येथे तपश्चर्येला बसले असताना जंगलातून एक वाघ आला. श्री मोरयांना पाहुन त्यांना खाण्याकरता भयंकर गर्जना करून त्यांच्यावर त्याने झडप घातली. त्या गर्जनेने श्री मोरयांनी डोळे उघडले. त्याच्याकडे पाहिले असता श्री मोरयांच्या तप तेजाने क्षणांत त्या वाघाची शिळा झाली. अजूनही ती शिळा थेऊर येथे पाहायला मिळते.
Morya Gosavi Ganpati Mandir Photos.











