शेलारवाडी किंवा घोरवडेश्वर लेणी ही महाराष्ट्र राज्यातील शेलारवाडी आणि घोरवडेश्वर गावाजवळची लेणी आहे.
दोन डोंगरांच्या मधोमध खिंडीत ह्या लेण्या आहे. आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे. तसेच हे एक प्रदूषण मुक्त पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात तर येथे फारच सुंदर निसर्गाचा नजारा दिसतो. ही गुफा म्हणजे पूर्वीबौद्ध भिक्षूंचे निवासस्थान असावे. पुढे काही स्वच्छ पाण्याच्या टाक्या दिसून येतात. इ.स. पूर्व २०० ते १५० हा या लेण्यांचा काळ असावा. पाण्याच्या २८ टाक्या येथे आहे. घोरवडेश्वर हेच येथील मुख्य दैवत आहे. हा सारा परिसर अतिशय रमनीय आहे. ५० बाई ७० फूट लांबी रुंदीची प्रशस्त गुंफा काळ्या खडकात कोरलेली आहे. डोंगराचा बार आहे तरीपण कशाचाही आधार नसून, हीएक प्रशस्त कोरली गेलेली गुंफा आहे. या गुंफेत श्री भगवान शंकराची पिंड आहे. पिंड चौकोनी आहे.पिंडीवर अभिषेक पात्र लटकविण्यासाठी छतावर अलंकारिक नक्षीकामाची रचना केलेली दिसते. नित्य पूजे आरतीमुळे वातावरण प्रसन्न आणि पवित्र होते.
डोंगरावर आणखी दोन लेणी आहेत. एका लेण्यापुढे पादुका तसेच नंदी आणि भैरवमूर्ती आहे. शेजारील खांबांच्या तळाशी घुमटाकार नक्षी आहे. मुख्य गाभाऱ्यास भगवान शिवाची पिंड असून, त्याच्या बाहेरील दगडी भिंतीवर काही शिलालेख कोरलेले आहे. देवनागरी लिपीतील एका शिलालेखावर “जालिंद्र पर्वत” असा उल्लेख आढळून येतो. शेजारी आणखी एक तिसरी लेणी आहे. तसेच या गुंफेमद्येसंतवाङ्मयाचा अभ्यास आणि साधना करण्यासाठी नित्य वारकरी मंडळी येत असतात. येथे विठ्ठल रखुमाई आणि श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मूर्ती आहेत.
चैत्यगृहाला लागून ध्यानासाठीनऊ खोल्या आहेत. एका भिंतीवर ब्राह्मी लिपीत लिहिलेल्या शिलालेखामद्ये ‘चैत्यगृह हे बुद्ध आणि संघाला “भदंतसिंह” चे शिष्य असलेल्या “धापर” च्या मुलींनी प्रेमाने समर्पित केले आहे. चैत्यगृह आता श्री घोरवडेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाऊ लागले आहे. असे सांगण्यात येते की श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे घोरावडी लेण्यांमध्ये तसेच निगडी जवळील दुर्गा टेकडी, भंडारा आणि देहू जवळील भामचंद्र यासारख्या ठिकाणी ध्यान करीत असे.
घोरवडेश्वर लेण्यांकडे जाताना काही काही ठिकाणी दगडांच्या पायऱ्या केलेल्या आहे. तर काही ठिकाणी अवघड वाट असल्यामुळे तेथे पायऱ्या करण्यात आलेल्या नाही.