हे क्षेत्र मुंबईपासून सुमारे 230 किलोमीटर आणि पुण्याहून जवळपास 180 किलोमीटरवर आहे. येथे पोहोचण्यासाठी एसटी बस किंवाखाजगी वाहनाने जाऊ शकता. पुण्याहून तीन मार्ग आहेत मुळशी, भोरवरून महाड मार्गे, वाई वरून महाबळेश्वर मार्गे जाता येते. महाराष्ट्रातल्या सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तेथे नदीच्या जवळच हरिहरेश्वर नावाचे गाव आहे. नदीच्या दुसऱ्या तीरावरश्रीवर्धन हे गाव आहे. ही दोन्ही गावे रायगड जिल्ह्यात येतात. हरिहरेश्वरला मुंबई गोवा रस्त्यावरील दासगावापासून फाटा फुटतो, तर श्रीवर्धन चा रस्ता मानगाव येथून सुरू होतो. तसेच श्रीवर्धनगावावरून होडीने सुद्धा हरिहरेश्वरला जाता येते. आणि माणगाव कोकण रेल्वे वरूनही हरिहरेश्वर ला जाता येते .
हरिहरेश्वर हे कोकण किनाऱ्या वरील एक निसर्गरम्य असे धार्मिक तीर्थस्थान आहे. एका बाजूला हिरव्यागार गर्द झाडांनी नटलेला डोंगरतर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र आणि रुपेरी वाळूने आकर्षित करणारा लांबचलांब समुद्रकिनारा. तसेच नारळाची झाडे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. हरिहरेश्वर मध्ये कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरेआहेत. तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड विष्णूतीर्थ अशी अनेक ठिकाणी आहेत. हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात एकूण 108 तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थहरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते.
रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थानमानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. हरिहरेश्वर देऊळ बरेच जुने आहे. ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे परंतु, बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाहीपहिल्या बाजीराविंनी या मंदिराचा जिर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचे पुरावे आहेत. हरिहरेश्वर चा समुद्र किनारा फार अतिशय सुंदर आहे. हरिहरेश्वर मंदिराच्या आजूबाजूच्या टेकड्यांना समुद्राच्या लाटांनी मोठं-मोठे खड्डे पडले आहेत. जणू फार वर्षांपूर्वी कोणी नक्षीकाम केले आहे असे वाटते.
हरिहरेश्वर हे ठिकाण दिवेआगर आणि श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याच्या सानिध्यात आहे. समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या शिवमंदिरासाठी ओळखले जाते.