कायदा म्हणजे काय? | what is law?
कायदा म्हणजे नियम , सूचना , निर्बंध आणि सगळ्यांना समान अधिकार होय . सगळ्यांना समान हक्क मिळवून देणे हे मुख्य कायद्याचे उध्दिस्ट आहे .
कायदा सरकार बनवते पण समाजात तो सर्वांना सारखाच लागू होतो .
सर्व समाजात धर्म , वंश , जात , वर्ग , लिंग यांच्या आधाराने भेदभाव केला जातो . अधिकार , सत्ता , श्रेष्ठता – कनिष्ठता या कल्पनांतूनही वेगवेगळ्या प्रकारे अन्याय केल्या जातो .
समाजातील ज्या ज्या लोकांवर अन्याय होतो , त्या लोकांना न्याय देण्याचे काम कायदा करते . आणि न्याय देण्याचे काम हे न्यायालयामध्ये चालते . म्हणूनच कायदा बनवणे फार महत्त्वाचे आहे .
स्वतंत्र्यानंतर आधुनिक मूल्यावर आधारित अशी राज्यघटना तयार करण्यात आली . आणि समाजात समानता अली . समाजात लहान – मोठा , गरीब – श्रीमंत , श्री – पुरुष , जात – पात असा कुठलाही भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांना समान संधी मिळावी यासाठी कायदा अस्तित्वात आणला .
कोणावरही अन्याय होऊ नये हे लोकशाही तत्व आपण मानतो म्हणून समाजातील समानता टिकवण्यासाठी आणि समाजातील अन्यायकारक प्रथा दूर करण्यासाठी निरनिराळे कायदे करावे लागतात . मुळात कुठलाही कायदा हा अचानक किंवा एकदम होत नाही .
समाजातील व्यवहार सुरळीत चालावेत कोणाही व्यक्तीवर अन्याय झाल्यास त्या व्यक्तीला न्याय मागता यावा यासाठी जे नियम बनवले जातात त्यालाच कायदे म्हणतात . कायदा माणसांचे हक्क त्यांचे अधिकार , कर्तव्य ठरवतो आणि कायदे मोडणाऱ्याला शिक्षाही करतो . प्रत्येकाला सुरक्षितता आणि संरक्षण देणे आणि अत्याचार छळ होत असल्यास अपराध्याला शिक्षा करणे ही शासनाची जबाबदारी आहे .