
नाग पंचमी | nag panchami
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. अशीएक आख्यायिका सांगितली जाते की, कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तोदिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्या दिवसापासून नागपूजा प्रचलीत आली असे मानले जाते.काही भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी झाडाला झोका बांधून खेळण्याची प्रथा आहे. दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातीलनाथ संप्रदायाचे लोक गंगा गौतमी संगमावर स्नान करतात.
दंतकथा :-
नागपंचमी सणाबद्दल अशी एक दंतकथा सांगण्यात येते की एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिनीची तीन पिल्ले मृत्युमुखीपडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशी समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही. घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही. तवा वापरायचा नाही. व कुटायच सुद्धा नाही. असे काही नियम पाळण्याचीप्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थनाकरतात. भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे थालीपीठ बनवले जाते.
सांस्कृतिक महत्त्व :-
भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणादारी सर्प याच्या फनेवर पुढच्या बाजूने १० च्या अंकासारखेचिन्ह असते. नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष सोडणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवाचे रूप मानून त्याची पूजा करू लागले. कृषी संस्कृतीत नागाच्या पूजनाचे महत्त्व विशेष आहे. नागआणि साप हे शेताचे रक्षण करते आणि शेतकरी बांधवांचा मित्र मानला जातो.
श्रिया व नागपंचमी सण :-
या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो. अशी परंपरा मानली जाते. नागपंचमीला स्त्रिया व मुलीझाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोका घेतात. नागपंचमीच्या दिवशी हाताला मेहंदी काढण्याची पद्धत आहे. नागपंचमीच्या दिवशीश्रिया मंदिरात जाऊन नागदेवता ची पूजा करतात व मंदिर परिसरातील मोकळ्या जागेमध्ये फुगड्या खेळण्याची पद्धत आहे.